Petrol Diesel Price : देशात पेट्रोल-डिझेलचे भाव इतक्या वेगात का वाढले? कधी स्वस्त होणार?

अनेक शहरांमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत शंभर रुपयांच्या जवळपास आली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती कधी कमी होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे (Petrol Diesel price when will be decrease in India).

Petrol Diesel Price : देशात पेट्रोल-डिझेलचे भाव इतक्या वेगात का वाढले? कधी स्वस्त होणार?
Petrol Price Today
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 4:05 PM

नवी दिल्ली : देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती आता गगनाला भिडल्या आहे. अनेक शहरांमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत शंभर रुपयांच्या जवळपास आली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती कधी कमी होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी (10 फेब्रुवारी) राज्यसभेत पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्यामागील कारण सांगितलं. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने देशातील पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केले तर किंमती कमी होऊ शकतात. मात्र, केंद्र सरकारने टॅक्स कमी करण्याबाबतचा कुठलाही विचार केलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं (Petrol Diesel price when will be decrease in India).

पेट्रोल-डिझेल केव्हा स्वस्त होणार?

एसकोर्ट सिक्योरिटीचे रिसर्च हेड आसिफ इक्बाल यांनी टीव्ही 9 सोबत बातचित केली. यावेळी त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी कधी होणार? या प्रश्नावर आपलं मत मांडलं. “केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील थोडेफार कर कमी केले तर किंमती कमी होऊ शकतात”, असं त्यांनी सांगितलं. पण केंद्र सरकार सध्या पेट्रोल-डिझेलची किंमती करण्यासाठी इच्छूक नाही (Petrol Diesel price when will be decrease in India).

एक्साईज ड्यूटी आणि वॅटमुळे सर्वसामान्यांवरी कराचा बोजा वाढला आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात सरकारने एक्साईज ड्यूटी दोन वेळा वाढवली होती. पेट्रोलवर 17 रुपये प्रती लिटर आणि डिझेलवर 16 रुपये प्रती लिटर एक्साईज ड्यूटी वाढली होती. एक्साईज ड्यूटीच्यावर राज्य सरकार वॅट वसूल करतात. ते कमी केले तर आजच पेट्रोल 20 रुपयांनी स्वस्त होऊ शकतं.

भाव का वाढत आहे?

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीतील वाढ झाल्याने पेट्रोल-डिझलचे दर वाढत आहे. कोरोनाच्या संकट काळानंतर हे प्रथमच झाले. काल ब्रेन्ट क्रूड तेलाने (Brent Crude) प्रति बॅरल 61 डॉलरचा टप्पा ओलांडला. त्यामुळे देशांतर्गत बाजारात आज दोन्ही इंधन महागले. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांमध्ये 30 आणि 25 पैसे प्रतिलिटर वाढ केली. काल या इंधनात प्रति लिटर 35 ते 35 पैशांची वाढ झाली होती. दिल्लीत बुधवारी पेट्रोल प्रति लिटर 87.60 रुपये तर डिझेल 77.73 रुपयांवर गेले

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 94.12 रुपये प्रतिलिटर नाशिक (Nashik Petrol Price Today): 93.65 रुपये प्रतिलिटर पुणे (Pune Petrol Price Today ): 93.54 रुपये प्रतिलिटर नागपूर (Nagpur Petrol Price Today): 94 .33 रुपये प्रतिलिटर दिल्ली (Delhi Petrol Price Today): 87.60 रुपये प्रति लिटर कोलकाता (Kolkata Petrol Price Today): लिटर 88.92 रुपये चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 89.96 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर

मुंबई (Mumbai Diesel Price Today): 84.63 रुपये प्रतिलिटर नाशिक (Nashik Diesel Price Today): 82.92 रुपये प्रतिलिटर पुणे (Pune Diesel Price Today): 82.81 रुपये प्रतिलिटर नागपूर (Nagpur Diesel Price Today): 84.91 रुपये प्रतिलिटर दिल्ली (Delhi Diesel Price Today): 77.73 रुपये प्रतिलिटर कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 81.31 रुपये रुपये प्रतिलिटर चेन्नई (Chennai Diesel Price Today) 82.90 रुपये प्रतिलिटर

हेही वाचा : Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा आजचे दर

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.