Petrol Diesel Rate Today : ब्रेंट क्रूड ऑईलचा षटकार, दरात झरझर वाढ, इंधन खरंच स्वस्त होणार?

Petrol Diesel Rate Today : ब्रेंट क्रूड ऑईलने जागतिक बाजारात उसळी घेतली आहे. बाजारात कच्चे तेल 80 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहे. या 1 मे नंतर पहिल्यांदा ब्रेंट क्रूड ऑईलने षटकार हाणला आहे. आता खरंच पेट्रोल-डिझेलचे दर उतरणार का?

Petrol Diesel Rate Today : ब्रेंट क्रूड ऑईलचा षटकार, दरात झरझर वाढ, इंधन खरंच स्वस्त होणार?
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 8:34 AM

नवी दिल्ली : देशात बोलघेवड्या नेत्यांची काही कमी नाही. इंधनावर मलाईदार कमाई होत असल्याने केंद्र आणि राज्य दर कपातीचा निर्णय घेण्यास तयार नाहीत. धन वर्षाव होत असल्याने पेट्रोल-डिझेलची दर कपात करणे टाळण्यात येते. त्यासाठी काही तरी जुजबी कारणं समोर केली जातात. तेल कंपन्या तोट्यात असल्याची आवई उठवण्यात येते. कधी पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे पिल्लू सोडल्या जाते. कोपराला गुळ लावण्याचा असा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून देशात सुरु आहे. त्यात बोलघेवडे नेते दिमतीला असतात. पण गेल्या वर्षभरात तरी जनतेला कोणताच दिलासा मिळालेला नाही. आता ब्रेंट क्रूड ऑईलने (Crude Oil) जागतिक बाजारात उसळी घेतली आहे. बाजारात कच्चे तेल 80 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहे. या 1 मे नंतर पहिल्यांदा ब्रेंट क्रूड ऑईलने षटकार हाणला आहे. आता खरंच पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) उतरणार का?

सकाळी किंमती अपडेट भारतीय तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर केल्या. सकाळी 6 वाजता इंधनाचे भाव अपडेट करण्यात आले. जून 2017 पूर्वी 15 दिवसांनी इंधनाच्या किंमती अपडेट करण्यात येत होत्या. आता कंपन्या दररोज इंधनाचे दर जाहीर करतात.

कच्चे तेल गगनाला भिडले जागतिक बाजारात कच्चा तेलाने मोठी उसळी घेतली. 13 जुलै रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 80.21 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल 76 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास पोहचले आहेत. या 1 मे नंतर पहिल्यांदा ब्रेंट क्रूड ऑईलने षटकार हाणला आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्यावर्षी उडाला होता भडका गेल्यावर्षी रशिया-युक्रेन युद्ध भडकले. कच्चे तेलाचे भाव मार्च 2022 मध्ये गगनाला भिडले.. किंमती प्रति बॅरल 140 डॉलरवर गेल्या. नवीन वर्षात, 2023 मध्ये कच्चा तेलाने मोठी उसळी घेतली नाही. भाव एकदाच 90 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचले. पण आता पुन्हा किंमतींनी उसळी घेतली आहे.

कंपन्या मालामाल भारतीय तेल कंपन्या गेल्या वर्षभरापासून फायद्यात आहेत. मे 2023 पर्यंत या कंपन्यांनी कमीत कमी 7.17 अब्ज डॉलरची बचत केली आहे. ही बचत म्हणजे कमाईच केली आहे. इंडियन एक्सप्रेसने भारतीय कॉमर्स मंत्रालयाच्या रिपोर्टआधारे ही आकडेवारी दिली आहे. रिपोर्टमध्ये गेल्या 14 महिन्यांतील डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 93.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.29 तर डिझेल 92.81 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 106.86 तर डिझेल 93.38 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.02 पेट्रोल आणि डिझेल 93.51 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.75 आणि डिझेल 94.21 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.55 आणि डिझेल 93.08 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.49 तर डिझेल 93.98 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.22 रुपये आणि डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.31 आणि डिझेल 92.82 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 105.91 आणि डिझेल 92.41 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.98 रुपये तर डिझेल 93.49 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 106.38 रुपये तर डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.