Petrol & Diesel: मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?
Petrol And Diesel | केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील करात प्रत्येकी 4.5 रुपयांची कपात करु शकते. त्यामुळे सरकारच्या उत्पन्नात विशेष घट होणार नाही.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीमुळे विरोधक आणि सामान्य नागरिकांकडून सातत्याने लक्ष्य होत असलेल्या मोदी सरकारकडून लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol and Diesel) वाढत्या किंमतींना ब्रेक लावण्यासाठी त्यावरील कर कमी केले जाऊ शकतात. इक्रा या रेटिंग एजन्सीच्या माहितीनुसार, केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील करात प्रत्येकी 4.5 रुपयांची कपात करु शकते. त्यामुळे सरकारच्या उत्पन्नात विशेष घट होणार नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या मागणीमुळे सरकारच्या ही तूट भविष्यात भरून निघेल. त्यामुळे मोदी सरकारकडून लवकरच इंधनावरील करात कपातीचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. (Petrol and Diesel rates and Tax)
केंद्र सरकारने मार्च 2020 ते मे 2020 या पेट्रोवरील सेस आणि सरचार्जमध्ये 13 रुपये तर डिझेलवरील सेल आणि सरचार्जमध्ये तब्बल 16 रुपयांची दरवाढ केली आहे. चालू आर्थिक वर्षातील परिस्थिती पाहता पेट्रोल-डिझेलची मागणी 14 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, इंधनाच्या दरात कपात न झाल्यास ही मागणी 13 टक्क्यांपर्यंत खाली घसरेल. 2021 मध्ये आतापर्यंत पेट्रोलची मागणी 10.6 टक्क्यांनी घटली आहे. तर इंधनावरील करापोटी केंद्र सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नात 55 टक्क्यांनी वाढ होऊ ते 3.5 लाख कोटी इतके झाले आहे.
मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल शंभरीपार
आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे भाव वाढल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ झाली आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, देशातील मेट्रो शहरांमध्ये शनिवारी पेट्रोलच्या दरात 31 ते 35 पैसे आणि डिझेलच्या दरात 34-37 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरात पेट्रोल शंभरीपार जाऊन पोहोचले आहे. तर चेन्नईतही पेट्रोलने शंभरी गाठली आहे. शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते.
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 4 मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढायला सुरुवात झाली होती. आतापर्यंत 30 वेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पेट्रोल 7.71 आणि डिझेल 7.92 रुपयांनी महागले आहे.
दररोज 6 वाजता किमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (petrol diesel price hike today by 35 paisa here is the new rates of all city mumbai delhi)
संबंधित बातम्या:
वर्षाअखेरपर्यंत पेट्रोल 125 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज, तज्ज्ञांचं म्हणणं काय?
Petrol & Diesel: राज्यात इंधनाच्या दराचा भडका; आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ