देशभरात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, दरात मोठी घट, जाणून घ्या काय आहे प्रकरण
इंधनाच्या महागड्या किमतींमुळे सर्वच देशांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इतर पर्याय निर्माण करण्याचा आग्रह धरला. हीच स्थिती राहिल्यास दुसरा पर्याय या देशांच्या कच्च्या तेलासाठी घातक ठरेल आणि अर्थातच व्यापारावरही परिणाम होणार असल्याचे तेल उत्पादक देशांना समजले. त्यामुळे त्यांनी हळूहळू तेलाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केलीय.
नवी दिल्लीः देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट होणार आहे, असंही पेट्रोलियम तज्ज्ञ नरेंद्र तनेजा सांगतात. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमीच राहण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात एलपीजीच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता वातावरण बदलू लागल्याचे तनेजा म्हणालेत. त्यामुळे आता त्याचे भाव वाढणार नसून कमी होण्याची शक्यता आहे.
तेलाची किंमत प्रति बॅरल 85 डॉलरवरून 78 डॉलर प्रति बॅरलपर्यंत
गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 85 डॉलरवरून 78 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरली. यावर तनेजा म्हणतात की, आता त्याची किंमत प्रति बॅरल 70 डॉलरपेक्षा कमी होण्याची वाट पाहत आहे. याची दोन प्रमुख कारणे त्यांनी दिली. नरेंद्र तनेजा यांच्या मते, या दोन मोठ्या कारणांपैकी सर्वात मोठे कारण म्हणजे नुकत्याच ग्लासगो येथे झालेल्या बैठकीत सर्व देशांच्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीबाबत चिंता व्यक्त करणे आणि त्याच बैठकीत भविष्यात इंधनाच्या पर्यायी वापरावर चर्चा होणे आहे.
इंधनाच्या जास्त किमतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांवर भर
इंधनाच्या महागड्या किमतींमुळे सर्वच देशांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इतर पर्याय निर्माण करण्याचा आग्रह धरला. हीच स्थिती राहिल्यास दुसरा पर्याय या देशांच्या कच्च्या तेलासाठी घातक ठरेल आणि अर्थातच व्यापारावरही परिणाम होणार असल्याचे तेल उत्पादक देशांना समजले. त्यामुळे त्यांनी हळूहळू तेलाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चर्चेदरम्यान कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यास सांगितले होते, यासाठी त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनाही या दिशेने पावले उचलण्याची विनंती केली होती.
कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अमेरिकेवरही दबाव
दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकवर दबाव आहे. जो बायडेन यांच्या हातात अमेरिकेची सत्ता आल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जवळपास 60 टक्क्यांनी वाढल्यात. इतकेच नाही तर अमेरिकेतील महागाईचा दरही 6 टक्क्यांवर पोहोचलाय. अमेरिकेतील बहुतेक लोक सार्वजनिक वाहतुकीऐवजी त्यांच्या वाहनांवर अवलंबून असतात. अमेरिकेतील जनतेने महागड्या इंधनाबाबत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर दबाव आणण्यास सुरुवात केलीय. महागड्या इंधनाबाबत देशवासीयांवर निर्माण होत असलेल्या दबावात असामान्य काहीही नाही हे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाही चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी बायडेन यांनीही आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे.
पुढील वर्षी अमेरिकेत संसदीय निवडणुका होणार
जो बायडेन यांनी कच्च्या तेलाच्या किमतींबाबत सौदी अरेबिया, इराक आणि इतर आखाती देशांवर तसेच ओपेकवर दबाव वाढवला. त्याचा हा परिणाम आहे. पुढच्या वर्षी अमेरिकेत संसदीय निवडणुका आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणे ही सर्वात मोठी समस्या बनू शकते. जर पक्षाचा पराभव झाला तर जो बायडेन यांचा 2024 मध्ये दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचं स्वप्न धुळीस मिळणार आहे.
संबंधित बातम्या
मोदी सरकार क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालणार; संसदेत विधेयक आणून कायदा करणार, नेमकं काय बदलणार?
OPEC च्या मनमानीला आळा बसणार, अमेरिका रिझर्व्हमधून 5 कोटी बॅरल तेल काढणार