नांदेड परभणीत देशात सर्वाधिक महाग पेट्रोल, शंभरीकडे वाटचाल, वाचा आजचे भाव !
राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल हे नांदेड आणि परभणीत आहे. आज नांदेडमध्ये प्रति लीटर पेट्रोलसाठी 94.33 रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होतो (Petrol-Diesel Price Today). त्यामुळे तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे बदललेले दर जारी करतात. अशात कोरोनाच्या कठीण काळात आता कुठे राज्याची अर्थव्यवस्था स्थिरावत असताना पुन्हा एकदा नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. कारण अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनांच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. अशात राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल हे नांदेड आणि परभणीत आहे. आज नांदेडमध्ये प्रति लीटर पेट्रोलसाठी 94.33 रुपये मोजावे लागणार आहेत. तर परभणीमध्येही प्रति लीटर पेट्रोलसाठी नागरिकांना 94.12 रुपये मोजावे लागणार आहे.
दरम्यान, जालन्यामध्ये आज प्रति लीटर पेट्रोलचा भाव 93.20 रुपये असून नंदूरबारमध्ये 93.16 उस्मानाबादमध्ये 93.07 आणि गडचिरोलीमध्ये 93.04 रुपये प्रति लीटर आहे. या वाढत्या इंधन वाढीमुळे नागरिकांना आर्थिक फटका बसणार आहे.
शहरं आजचे भाव कालचे भाव
अकोला 92.10 91.80
अमरावती 93.09 92.01
औरंगाबाद 92.82 92.97
भंडारा 92.77 92.43
बीड 92.05 92.70
बुलढाणा 92.25 92.44
चंद्रपूर 92.02 92.39
धुळे 91.96 91.77
गडचिरोली 93.04 92.38
गोंदिया 93.13 92.69
ग्रेटर मुंबई 92.20 91.85
हिंगोली 92.77 93.18
जळगाव 92.25 92.05
जालना 93.20 93.15
कोल्हापूर 92.31 91.80
लातूर 92.91 92.97
मुंबई 92.04 91.80
नागपूर 91.94 91.81
नांदेड 94.33 94.09
नंदूरब 93.16 92.70
नाशिक 92.02 92.13
परभणी 94.12 93.89
पुणे 91.74 91.94
पेट्रोलचे दर आवाक्याबाहेर जाण्याचं कारण काय?
राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांकी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90 च्या पार गेली आहे. तर डिझेलचे दर हे 80 रुपयांच्या पार गेले आहेत. मात्र, प्रक्रिया केल्यानंतर पेट्रोल पंपावर पेट्रोलचा मूळ दर हा 28.50 रुपये प्रति लीटर असते. तर डिझेलचा मूळ दर हा 29.52 रुपये प्रति लीटर असते. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. सरकार पेट्रोल आणि डिझेलवर त्याच्या मुळ किमतीच्या दुप्पटीपेक्षा जास्त कर आकारते.
सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात .
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?
मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.
संबंधित बातम्या –
सौदी अरेबियाचा पेट्रोल डिझेलबाबत मोठा निर्णय, भारताची नाराजी, ‘हा’ परिणाम होणार
Bad Bank काय आहे? बँकिंग क्षेत्रातील सुधारणेसाठी अर्थसंकल्पात याची घोषणा होण्याची शक्यता का?
बँकेच्या खातेदारांसाठी मोठी बातमी! 1 फेब्रुवारीपासून ‘या’ बँकेच्या ATM मधून पैसे काढता येणार नाहीत