प्रजासत्ताकाच्या आदल्यादिवशीही पेट्रोल महाराष्ट्रात महागडच; सर्वाधिक भाव नांदेड, परभणीत
आज परभणीमध्ये प्रति लीटर पेट्रोलसाठी 94.61 रुपये मोजावे लागणार आहेत तर नांदेडमध्ये प्रति लीटर पेट्रोलचा भाव 94.42 रुपयांवर पोहोचला आहे.
मुंबई : कोरोनाच्या भीषण काळानंतर आता कुठे सगळी परिस्थिती सुधारत असताना इंधनाचे दर मात्र वाढत चालले आहेत. देशातील सगळ्यात महागडे इंधन राज्यात नांदेड आणि परभणीत आहे. खरंतर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होतो (Petrol-Diesel Price Today). त्यामुळे तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे बदललेले दर जारी करतात. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनांच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. आज परभणीमध्ये प्रति लीटर पेट्रोलसाठी 94.61 रुपये मोजावे लागणार आहेत तर नांदेडमध्ये प्रति लीटर पेट्रोलचा भाव 94.42 रुपयांवर पोहोचला आहे. (petrol rate hike in Maharashtra before Republic Day highest in Nanded and Parbhani )
खरंतर, काल सर्वाधिक पेट्रोल वाढ ही परभणीमध्येच होती. त्यााधी नांदेड आणि परभणीमध्ये सगळ्यात जास्त इंधनाचे दर होते. रविवारी परभणीमध्ये प्रति लीटर पेट्रोलसाठी 94.65 रुपये भाव होता तर नांदेडमध्ये काल आणि आज पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं नाही.
दरम्यान, जालन्यामध्ये आज प्रति लीटर पेट्रोलचा भाव 93.70 रुपये असून उस्मानाबादमध्ये 92.43 आणि गडचिरोलीमध्ये 93.28 रुपये प्रति लीटर आहे. या वाढत्या इंधन वाढीमुळे नागरिकांना आर्थिक फटका बसणार आहे.
शहरं आजचे भाव कालचे भाव
अकोला 92.49 92.65
अमरावती 93.49 93.10
औरंगाबाद 93.49 92.50
भंडारा 92.96 92.91
बीड 93.60 93.60
बुलढाणा 92.91 92.80
चंद्रपूर 92.25 92.24
धुळे 92.51 92.51
गडचिरोली 93.28 93.06
गोंदिया 93.43 93.72
ग्रेटर मुंबई 92.34 92.32
हिंगोली 93.71 93.28
जळगाव 93.44 92.25
जालना 93.70 93.58
कोल्हापूर 92.57 92.11
लातूर 93.26 93.46
मुंबई 92.28 92.28
नागपूर 92.24 92.79
नांदेड 94.42 94.42
नंदूरबार 93.15 92.87
नाशिक 92.04 92.78
परभणी 94.61 94.65
पुणे 92.70 92.07
पेट्रोलचे दर आवाक्याबाहेर जाण्याचं कारण काय?
राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांकी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90 च्या पार गेली आहे. तर डिझेलचे दर हे 80 रुपयांच्या पार गेले आहेत. मात्र, प्रक्रिया केल्यानंतर पेट्रोल पंपावर पेट्रोलचा मूळ दर हा 28.50 रुपये प्रति लीटर असते. तर डिझेलचा मूळ दर हा 29.52 रुपये प्रति लीटर असते. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. सरकार पेट्रोल आणि डिझेलवर त्याच्या मुळ किमतीच्या दुप्पटीपेक्षा जास्त कर आकारते.
सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात .
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?
मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल. (petrol rate hike in Maharashtra before Republic Day highest in Nanded and Parbhani )
संबंधित बातम्या –
Petrol Price Today : देशातलं सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात, परभणीत दर 95 रुपयांकडे!
सौदी अरेबियाचा पेट्रोल डिझेलबाबत मोठा निर्णय, भारताची नाराजी, ‘हा’ परिणाम होणार
आता 5, 10 आणि 100 च्या जुन्या नोटा होणार बाद, पण त्याआधी वाचा ‘हा’ नियम
‘या’ 3 बँकांमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, RBI ने केली मोठी घोषणा
(petrol rate hike in Maharashtra before Republic Day highest in Nanded and Parbhani )