AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Price : पेट्रोल केवळ15 रुपये लिटर, नितीन गडकरी यांच्या दाव्याने खळबळ

Petrol Price : पेट्रोलच्या किंमती कधी कमी होतील, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. गेल्या एका वर्षांपासून किंमती जैसे थे आहेत. पण इंधनाचे भाव गगानाला भिडलेले आहेत. ते कमी व्हावेत अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

Petrol Price :  पेट्रोल केवळ15 रुपये लिटर, नितीन गडकरी यांच्या दाव्याने खळबळ
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 5:27 PM

नवी दिल्ली : देशात इंधनाच्या वाढत्या (Fuel Rate) किंमतीविरोधात जनतेत रोष आहे. किंमतींनी 100 रुपयांचा टप्पा ओलांडल्याने जनतेत नाराजी आहे. गेल्या वर्षी मे, 2022 मध्ये केंद्राने उत्पादन शुल्कात तर राज्यांनी मूल्यवर्धित करात कपात केल्यानंतर किंमतीत थोडीफार घट आली. पण पेट्रोल-डिझेलच चढ्या दरानेच खरेदी करावे लागत आहे. पेट्रोलियम कंपन्या सध्या नफ्यात आहेत. रशिया आणि इतर देशांकडून स्वस्तात कच्चे तेल मिळवून ते युरोपमध्ये विक्री करण्यात येत आहे. त्यातून कंपन्यांना फायदा होत आहे. राज्य आणि केंद्र सरकारला इंधनावरील करातून फायदा होत आहे. पण पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Rate) कधी स्वस्त होणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पेट्रोल अगदी 15 रुपये लिटर दराने मिळू शकते, असा खळबळजनक दावा केला आहे.

पेट्रोल-डिझेल स्वस्ताई कधी काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या (OMC) याविषयीचा निर्णय घेतील. या कंपन्या पुढील काही महिन्यांत पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करु शकतात. या कंपन्यांच्या तोट्याची भरपाई झाली आहे. गेल्या तिमाहीत या कंपन्यांना जोरदार फायदा झाला आहे. पुढील तिमाहीत जर या कंपन्यांनी जबरदस्त आघाडी घेतली तर इंधनाचे दर घसरु शकतात.

मिळाली नुकसान भरपाई देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईलचा सर्व मिळून निव्वळ नफा 52 टक्के झाला आहे. कंपनीने मार्च तिमाहीत 10,841 कोटींचा निव्वळ नफा कमावला होता. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च तिमाहीत कंपनीने 7,089 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने मार्च तिमाहीत 79 टक्के निव्वळ नफा मिळवला. नफ्याचे गणित पुढील तिमाहीसाठी कायम राहिल्यास पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

किंमती भिडल्या गगनाला गेल्या वर्षी फेब्रुवारी 2022 मध्ये शेवटच्या आठवड्यात युक्रेनवर रशियाने हल्ला चढविला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या भावात जबरदस्त उसळी आली. कच्चे तेल 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. 2008 नंतर कच्चा तेलाची ही उच्चांकी उडी होती. जगात त्याचे पडसाद उमटले. श्रीलंकेसह अनेक छोट्या अर्थव्यवस्था भरडल्या गेल्या. या देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या. भारतात तर पेट्रोल 120 लिटरच्या घरात पोहचले. डिझेलमध्ये रेकॉर्डब्रेक उसळी घेतली.

पेट्रोल इतके स्वस्त कसे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक फॉर्म्युला दिला आहे. त्यानुसार, देशात पेट्रोल केवळ 15 रुपये प्रति लिटर दराने विक्री होईल, असा दावा केला आहे. बुधवारी राजस्थानमधील प्रतापगडमध्ये नितीन गडकरी यांनी पेट्रोल स्वस्ताईविषयी वक्तव्य केले. वाहनांमध्ये 60% इथेनॉल आणि 40% विजेचा वापर झाल्यास देशात पेट्रोलचा वापर कमी होईल. पेट्रोल केवळ 15 रुपये लिटर दराने मिळेल असा दावा त्यांनी केला. यामुळे देशात पेट्रोलचा वापरच कमी होणार नाही तर प्रदुषणही कमी होईल, असे मत त्यांनी मांडले.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.