AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एजंटची गरज नाही, एका क्लिकवर जाणून घ्या PF संबंधित 4 महत्त्वाची कामं

अनेकांना पीएफ खात्यातील पैसे काढण्यापासून ते अपडेट करण्यापर्यंतची काहीही माहिती नसते. मात्र आज आम्ही तुम्हाला एकाच बातमीत या गोष्टी ऑनलाईन कशा करायच्या याची माहिती देणार आहोत.

एजंटची गरज नाही, एका क्लिकवर जाणून घ्या PF संबंधित 4 महत्त्वाची कामं
पीएफ
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 1:25 PM

मुंबई : आपण एखाद्या खाजगी मर्यादित कंपनीत काम करत असल्यास आपल्या पगाराचा काही भाग भविष्य निर्वाह निधी (पीएफ) वजा केला जातो. हे पैसे कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा केले जातात. मात्र अनेकांना ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते. अनेकांना पीएफ खात्यातील पैसे काढण्यापासून ते अपडेट करण्यापर्यंतची काहीही माहिती नसते. मात्र आज आम्ही तुम्हाला एकाच बातमीत या गोष्टी ऑनलाईन कशा करायच्या याची माहिती देणार आहोत. (PF Account Balance to UAN number know how to handle your Pf Account from home)

विशेष म्हणजे नुकतंच ईपीएफओने प्रत्येक कामाच्या प्रक्रियेसाठी काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओ द्वारे तुम्ही संपूर्ण प्रक्रिया सहजरित्या समजून घेऊ शकता. तसेच घरबसल्या एका क्लिकवर पीएफसंबंधित काम करु शकता. चला तर जाणून घेऊ अशी कोणती काम आहेत, जे आपण घरबसल्या करु शकतो.

Check EPF Balance : कसा चेक कराल पीएफ बॅलेन्स

पीएफ ग्राहक एसएमएस, मिस्ड कॉल, वेबसाईट आणि उमंग अॅप्लीकेशनद्वारे पीएफ बॅलन्स चेक करु शकतात. SMS द्वारे ईपीएफ अकाऊंट बॅलेन्स तपासण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन EPFOHO UAN LAN टाईप करुन तो 7738299899 वर पाठवावा लागणार आहे. त्यासोबत 01122901406 फक्त मिस कॉल देऊन पीएफ बॅलन्स चेक करता येणार आहे. तसेच वेबसाईटवरही तुम्हाला पीएफचा बॅलन्स चेक करता येईल. तसेच या ठिकाणी तुम्हाला पासबुकही डाऊनलोड करता येईल.

Update Date of Exit: अशी करा Date of Exit अपडेट

जेव्हा आपण एका ठिकाणाहून नोकरी सोडता आणि दुसर्‍या ठिकाणी रुजू होता त्यावेळी तुम्हाला Date of Exit अपडेट करावी लागते. यासाठी तुम्ही प्रथम अधिकृत वेबसाईटवर जा. यानंतर मॅनेज ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर एक्झिटवर क्लिक करुन पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

Know Your UAN: असा जाणून घ्या UAN नंबर?

तुमचा UAN नंबर जाणून घेण्यासाठी तुम्ही epfindia.gov.in वर जा. त्यानंतर सर्व्हिसेसवर क्लिक करुन त्याठिकाणी असलेल्या Employees ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर Know Your UAN ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर दिलेली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत UAN क्रमांक जाणून घ्या.

Generate Direct UAN: असा करा UAN जनरेट?

जर तुम्ही अद्याप तुमचे UAN जनरेट केले नसेल तर एखाद्या अधिकृत वेबसाईटवर जा. त्यावर जाऊन Activate UAN या ऑप्शनवर क्लि करा. यानंतर दिलेली माहिती भरुन ओटीपी टाकून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा.

(PF Account Balance to UAN number know how to handle your Pf Account from home)

संबंधित बातम्या : 

जूनअखेर ‘ही’ महत्त्वाची काम तातडीने निपटा, अन्यथा मोठं नुकसान निश्चित

तुमच्याकडे दोन रुपयांचं नाणं आहे का? मग तुम्हीही होऊ शकता लखपती, जाणून घ्या कसे?

प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....