PHOTOS : Google चं जगातील पहिलं रिटेल स्टोअर सुरू, पाहा हायटेक सुविधांनी युक्त दुकानाचे फोटो
अॅपलच्या पावलावर पाऊल ठेवत गुगलने (Google) जगातील पहिलं रिटेल स्टोअर न्यूयॉर्कमध्ये सुरू केलंय. गुगलच्या या दुकानात कंपनी आपले हार्डवेअर प्रोडक्ट्स आणि इतर अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स विकणार आहे.
1 / 5
Google first retail store: अॅपलच्या पावलावर पाऊल ठेवत गुगलने (Google) जगातील पहिलं रिटेल स्टोअर न्यूयॉर्कमध्ये सुरू केलंय. गुगलच्या या दुकानात कंपनी आपले हार्डवेअर प्रोडक्ट्स आणि इतर अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स विकणार आहे.
2 / 5
गुगलचं हे दुकान न्यूयॉर्क सिटीच्या Chelsea भागात आहे. या ठिकाणी ग्राहकांना गुगल निर्मित हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर खरेदी करता येणार आहेत. या दुकानात पिक्सल फोन, WearOS, Nest आणि Fitbit सारखे डिवाईस खरेदी करता येतील. गुगलचं हे स्टोअर 5000 स्क्वेअर फूटचं आहे.
3 / 5
कंपनीच्या पहिल्या रिटेल स्टोअरबाबत गुगलने आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विट करत माहिती दिलीय. या ट्विटमध्ये त्यांनी कंपनीचं पहिलं स्टोअर सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. हे स्टोअर ज्या ठिकाणी सुरू करण्यात आलंय त्याला LEED प्लॅटिनम रेटिंग मिळालेलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच मी जेव्हा केव्हा न्यूयॉर्कमध्ये येईल तेव्हा या स्टोअरला भेट देईल असंही ते म्हणाले.
4 / 5
गुगलचं स्टोअर जेथे सुरू झालंय तेथे आधी पोस्ट ऑफिस आणि स्टारबक्स कॅफेटेरिया होतं. नव्या कॉर्पोरेट लँडलॉर्ड नियमांनुसार या दोन्ही कार्यालयांचा लीज कालावधी संपल्यानंतर ही जागा रिकामी करण्यात आली. त्यानंतर इथं गुगलने स्टोअर सुरू केलं.
5 / 5
गुगलचं हे स्टोअर खूपच हायटेक करण्यात आलंय. या ठिकाणी ग्राहकांसाठी गेमिंग एरिया देखील बनवण्यात आलाय. होम थियेटर टेस्टिंगसाठी साउंडप्रूफ खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. गुगलचा पिक्सल फोनमध्ये बिघाड झाल्यास ग्राहक या ठिकाणी येऊन तो दुरुस्त करु शकणार आहेत.