ननंदबाईच्या मुलाला सांभाळताना दिसली राधिका मर्चंट, ‘ते’ फोटो व्हायरल, अंबानींच्या..
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न मुंबईमध्ये होणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची क्रुझ पार्टी पार पडलीये. आता या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. सुरूवातीला सांगितले गेले की, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न लंडन येथे होईल. मात्र, रिपोर्टनुसार 12 जुलै रोजी मुंबईमध्येच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न होणार आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन पार पडले. यानंतर क्रूझवर 3 दिवस दुसरे प्री वेडिंग फंक्शन झाले. या प्री वेडिंग फंक्शनसाठी अत्यंत खास लोक उपस्थित होते. काही बॉलिवूड कलाकारही या प्री वेडिंगसाठी पोहचले.
आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या क्रूझवरील प्री वेडिंग फंक्शनचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. सर्वजण या पार्टीत धमाल करताना देखील दिसत आहेत. आता राधिका मर्चंट हिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे राधिकाचे हे फोटो लोकांना प्रचंड आवडल्याचे बघायला मिळतंय.
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये प्री वेडिंग फंक्शन सुरू असताना राधिका मर्चंट ही ननंद ईशा अंबानी हिचा मुलगा कृष्णा याला सांभाळताना दिसतंय. हेच नाही तर मांडीवर घेऊन त्याच्यासोबत मस्ती करताना राधिका मर्चंट दिसतंय. लोकांना राधिका मर्चंटचे व्हायरल होणारे हे फोटो प्रचंड आवडल्याचे देखील दिसत आहेत. लोक यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
रिपोर्टनुसार राधिका आणि अनंत अंबानीचे लग्न 10 ते 12 जुलैला होणार आहे. हे लग्न हिंदू रितीरिवाजानुसार होईल. 10 ते 12 जुलैला संगीत, हळद आणि मेहंदीचे फंक्शन होणार आहेत. शेवटी 12 जुलैला लग्न होईल. हेच नाही तर अंबानी कुटुंबियांकडून रिसेप्शनही मुंबईतच ठेवले जाईल. जवळपास लग्नाच्या सर्व कौटुंबिक विधी या अंबानी यांच्या घरी होतील.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाबद्दल लोकांमध्ये मोठे क्रेझ बघायला मिळतंय. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. हेच नाही तर अत्यंत खास अशा लग्नपत्रिका देखील तयार करण्यात आल्या. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष आहे.