Fact Check : पुढच्या वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कापणार? पाहा खरं आहे की खोटं

श्रम कायद्यात बदल झाल्यामुळे ही पगार कपात होणार असल्याचं बोललं जात आहे.

Fact Check : पुढच्या वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कापणार? पाहा खरं आहे की खोटं
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 8:15 PM

नवी दिल्ली : पुढच्या वर्षी सर्व सरकारी कर्मचार्‍यांचे (government employees) पगार (salary) कमी करण्यात येणार असल्याची बातमी तुम्हीही वाचली असेल. श्रम कायद्यात बदल झाल्यामुळे ही पगार कपात होणार असल्याचं बोललं जात आहे. पण ही बातमी खोटी असल्याचं समोर आलं आहे. असे अनेक फसवे मेसेज आणि बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्याला काही आधार नसतो. सरकारने अशी कुठलीही घोषणा केली नसून ही बातमी लोकांची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल करण्यात येत आहे. (pib fact check government employees salary latest news cut for central government employees)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नवीन कामगार कायद्यात बदल झाल्यानंतर पगार कपात होणार नाही. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. PIB F act Check मध्ये यासंदर्भात स्पष्टिकरण देण्यात आला आहे. ही बातमी खोटी असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. वेतन विधेयक, 2019 केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना लागू होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकार नाही तर खासगी कर्मचार्‍यांना होणार नियम लागू

सरकारने गेल्या वर्षी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचा लाभ वाढवण्यासाठी संसदेत वेतन विधेयक संहिता 2019 पास केलं होतं. यामध्ये किमान वेतन कायदा, वेतन देय कायदा, बोनस पेमेंट अॅक्ट आणि समान मोबदला कायदा यासारख्या कामगार कायद्यांचा समावेश करण्यात आला आहे. 1 ऑक्टोबर 2021 पासून केंद्रीय कामगार आणि रोजगार सचिव अपूर्व चंद्रा याची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सरकारी नियमांनुसार, ग्रॅच्युइटी आणि भविष्य निर्वाह निधीचे योगदान कर्मचार्‍यांच्या एकूण पगाराच्या किमान 50 टक्के असावं. हा नियम पाळण्यासाठी, मालकांना त्यांच्या कर्मचार्‍यांच्या मूलभूत पगारामध्ये 50 टक्के वाढ करावी लागणार आहे. म्हणजेच कर्मचार्‍यांच्या इनहँड पगारात कपात होईल. पण, हा नियम लागू झाल्यानंतर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आधीपेक्षा जास्त लाभ मिळेल. (pib fact check government employees salary latest news cut for central government employees)

संबंधित बातम्या –

दिवसाला फक्त 20 रुपयांच्या बचतीवर मिळवा 2 लाख 65 हजार, खास आहे LIC ची योजना

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताय?, 1 जानेवारीपासून महत्त्वाचे 5 नियम बदलणार

(pib fact check government employees salary latest news cut for central government employees)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.