Gautam Adani : पडद्यामागील घडामोडी काय? अदानी यांनी तारण ठेवले दोन कंपन्यांचे स्टॉक

Gautam Adani : शेअर बाजारात कमबॅक केलेल्या अदानी समूहाबाबत काही घडामोडींमुळे गुंतवणूकदार पुन्हा चिंतातूर झाले आहेत. पडद्यामागे काय घडामोडी सुरु आहेत, असा प्रश्न आता त्यांना पडला आहे. त्यातच एनएससीने तीन शेअरवर नजर रोखल्याने काहूर उठले आहे.

Gautam Adani : पडद्यामागील घडामोडी काय? अदानी यांनी तारण ठेवले दोन कंपन्यांचे स्टॉक
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 4:37 PM

नवी दिल्ली : अदानी समूह (Adani Group) सर्वच बाजूने अडचणीत सापडलेला आहे. आताच कुठे आनंदवार्ता मिळत असताना पुन्हा पडद्यामागे काही घडामोडी घडत असल्याचा संशय गुंतवणूकदारांना येत आहे. शेअर बाजारात कमबॅक केलेल्या अदानी समूहाबाबत काही घडामोडींमुळे गुंतवणूकदार (Investors) पुन्हा चिंतातूर झाले आहेत. अदानी समूहाने हिंडनबर्ग अहवालापूर्वी (Hindenburg Report) विस्तार योजना आखल्या होत्या. पण आता त्यांनी कर्ज चुकते करण्याला प्राधान्यक्रम दिला आहे. त्यासाठी अदानी समूहाने त्यांच्या दोन कंपन्यांचे शेअर तारण म्हणून ठेवले आहे. पडद्यामागे काय घडामोडी सुरु आहेत, असा प्रश्न आता त्यांना पडला आहे. त्यातच एनएससीने तीन शेअरवर नजर रोखल्याने काहूर उठले आहे.

या समूहाची मुख्य कंपनी अदानी इंटरप्राईजेसच्या (Adani Enterprises) कर्जप्रकरणात हा निर्णय घेण्यात आला आहे. रेग्युलेटरी फाईलिंगनुसार, अदानी ट्रांसमिशनचे (Adani Transmission) 0.99 टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जीचे (Adani Green Energy) 0.76 टक्के शेअर एसबीआयकॅप ट्रस्टीकडे (SBICAP Trustee) तारण ठेवण्यात आले आहे. सध्याच्या बाजारभावानुसार, या शेअरची किंमत 1,670 रुपये आहे. एक दिवसापूर्वी अदानी समूहाने त्यांच्या चार कंपन्यांचे शेअर कर्ज प्रकरणातून मुक्त केले होते.

एसबीआयकॅप ट्रस्टी देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचे (SBI) एक युनिट आहे. कर्जदारांची रक्कम चुकती करण्यासाठी अदानी समूहाने हे शेअर तारण ठेवले आहेत. यामुळे अदानी ट्रांसमिशनमध्ये तारण ठेवलेल्या शेअर्सची संख्या 1.32 टक्क्यांवर पोहचली आहे. केवळ सुरक्षेसाठी हे शेअर तारण ठेवल्याचे एसबीआयकॅप ट्रस्टीने स्पष्ट केले आहे. एसबीआयकॅप ट्रस्टीने स्पष्ट केले आहे की, ते कोणालाच कर्ज देत नाहीत, केवळ सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रक्रिया झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पण अदानी समूहाच्या प्रमोटर्सनी कोणत्या कारणासाठी अतिरिक्त शेअर तारण ठेवले आणि कर्ज देणारी कंपनी कोण आहे, हे अद्याप समोर आलेले नाही.

हे सुद्धा वाचा

गेल्या महिन्यात अदानी यांनी तीन कंपन्यांचे 1,038 कोटी रुपयांचे अतिरिक्त शेअर तारण ठेवले होते. त्यावेळी त्यांनी अदानी ट्रांसमिशनचे 0.11 टक्के, अदानी ग्रीन एनर्जीचे 0.38 टक्के तर अदानी पोर्टसचे 0.35 टक्के शेअर तारण ठेवले होते. ज्यावेळीही तारण ठेवलेल्या शेअर्सच्या संख्येत बदल होतो, त्यावेळी त्याची माहिती मार्केट रेग्युलेटरला द्यावी लागते असे एसबीआयकॅप ट्रस्टीच्या प्रवक्त्याने सांगितले. सुरक्षेची हमी म्हणून ही प्रक्रिया करण्यात आली, यामध्ये वित्तीय विषय नसल्याचे ट्रस्टी कंपनीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान अदानी समूहाने 4,100 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. गुरुवारपर्यंत ही रक्कम अदा करणे गरजचे होते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मंगळवारीच अदानी समूहाने ही रक्कम अदा केली. अदानी समूहाने अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी खरेदीसाठी हे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड करण्यात आली आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.