मोठी बातमी, कोरोनामुळं आरोग्य सेवकाचा मृत्यू झाल्यास 48 तासात 50 लाख मिळणार

कोरोना विषाणू संसर्गाशी लढणाऱ्या आरोग्य सेवकांसाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. PM Garib Kalyan Package

मोठी बातमी, कोरोनामुळं आरोग्य सेवकाचा मृत्यू झाल्यास 48 तासात 50 लाख मिळणार
Corona
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 12:08 PM

नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाशी लढणाऱ्या आरोग्य सेवकांसाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. केंद्र सरकारनं एखाद्या आरोग्य सेवकाचा कोरोनानं मृत्यू झाल्यास त्याच्या विम्याचा क्लेम मंजूर करण्यासाठी नवीन प्रणाली सुरु करत आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज विम्याचा क्लेम प्रमाणित करतील आणि विमा कंपनी पुढील 48 तासांमध्ये क्लेमची कार्यवाही पूर्ण करेल. फ्रंटलाईनवर आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा केंद्र सरकारची प्राथमिकता असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. (PM Garib Kalyan Package PMGKP Insurance Company settle the claims within a period of 48 hours Central Government launched new system)

किती रक्कम मिळणार?

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा योजनेचा कालावधी एक वर्षांनी वाढवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत आरोग्य सेवकाचा कोरोनावरील उपचार घेताना मृत्यू झाल्यास केंद्र सरकारकडून या विमा योजनेअंतर्गत 50 लाखांचं विमा संरक्षण दिलं जातं. त्यामुळे एखाद्या आरोग्य सेवकाचा कोरोनावरील उपचार घेताना मृत्यू झाल्यास त्याला 50 लाख रुपयापर्यंतची रक्कम मिळेल.

48 तासांमध्ये विमा क्लेम सेटल होणार

एखाद्या आरोग्य सेवकाचा कोरोनावरील उपचार घेताना मृत्यू झाल्यास प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत काढलेल्या विम्याचा क्लेम 48 तासांमंध्ये सेटल करावा लागणार आहे. ही प्रक्रिया सोपी आणि वेगवान व्हावी म्हणून नवीन प्रणाली बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी पातळीवर राज्य सरकाराकंकडून जलदगतीनं प्रयत्न केले जातील. याशिवाय जिल्हाधिकारी विम्यासंदर्भातील त्यांच्याकडील कार्यवाही पूर्ण केल्यानंतर विमा कंपनीला 48 तासांमध्ये क्लेम मंजूर करावा लागणार आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं याविषयी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना याविषयी सूचना दिल्या आहेत. त्या सूचनांची तातडीनं अंमलबजावणी केली जाणार आहे.

विमा पॉलिसीचा कालावधी दोन वेळा वाढवला

केंद्र सरकारनं कोरोना रुग्णांची देखभाल करणाऱ्या त्यांच्यावर उपचार करणाऱ्या आरोग्य सेवकांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा पॉलिसी जाहीर केली होती. त्यानुसार न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला विमा पॉलिसीचं काम देण्यात आलं आहे. या विमा पॉलिसीची मुदत दोन वेळा वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा:

नोकरदारासांठी मोठी बातमी, EPFO 6 कोटी खातेधारकांना ‘या’ कारणामुळे पैसे पाठणार

जीएसटी रिटर्न भरण्याची मर्यादा सरकारने वाढविली, आता ‘या’ तारखेपर्यंत भरू शकता माहिती

(PM Garib Kalyan Package PMGKP Insurance Company settle the claims within a period of 48 hours Central Government launched new system)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.