या तारखेला शेतकर्यांना खुशखबर, पण हे काम नाही केले तर होईल पश्चताप
PM Kisan Yojana : लवकरच देशातील 13 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मोठी बातमी मिळणार आहे. त्यांना कोणती आनंदवार्ता येणार हे समजलंच असेल. या सर्व शेतकर्यांच्या बँक खात्यात 19वा हप्ता, 2000 रुपये जमा होईल. या दिवशी हा हप्ता जमा होणार आहे.

PM Kisan Scheme : देशातील जवळपास 13 कोटी शेतकऱ्यांना लवकरच आनंदवार्ता मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर असताना ही गोड बातमी धडकेल. पीएम किसान योजनाचा 19 वा हप्ता कधी जमा होणार याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. ही प्रतिक्षा संपणार आहे. या दिवशी 2000 रुपये खात्यात जमा झाल्याचा मॅसेज या कोट्यवधी शेतकऱ्यांना लवकरच येईल. पण त्याआधी हे काम करणे आवश्यक आहे. नाहीतर हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही. केंद्र सरकार या योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6000 रुपये का आर्थिक लाभ देती है.
आता 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा
देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. सरकार वर्षभरात तीनदा 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते जमा करण्यात आले आहे. आता 9 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. ही रक्कम याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पण त्या आधी हे काम करावे लागेल. नाही तर योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही.




24 फेब्रुवारी रोजी रक्कम जमा होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार दौऱ्यावर जात आहेत. ते 24 फेब्रुवारी रोजी शेतकर्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जमा करतील. याविषयीची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. देशातील जवळपास 13 कोटी शेतकर्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल.
ई-केवायसी अगोदर करा
सरकारच्या गाईडलाईन्सचे पालन केले नाही तर 19 वा हप्ता खात्यात जमा होणार नाही. पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकर्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. नियमानुसार ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
आता एकाच व्यक्तीला लाभ
पीएम किसान योजनेतंर्गत काही नियम बदलण्यात आले आहे. त्यानुसार एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच लाभ घेता येईल. इतर सदस्यांचा पत्ता कट होणार आहे. पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली आली आहे. यामध्ये अनेक बदल झाल्याचे दिसून आले.