PM-KISAN योजनेत गडबड, अपात्र लाभार्थ्यांमध्ये वाटले गेले 1364 कोटी, असे चेक करा तुमचे पैसे
अधिक माहितीनुसार, माहिती अधिकारांतर्गत आतापर्यंत तब्बल 20 लाख अपात्र लाभार्थ्यांनी 1364 कोटी रुपयांचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान किसान (PM-KISAN) सन्मान योजनेंतर्गत सातवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जात आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैशाचा सातवा हप्ता 31 मार्च 2021 पर्यंत ट्रान्सफर करण्यात येणार आहे. अधिक माहितीनुसार, माहिती अधिकारांतर्गत आतापर्यंत तब्बल 20 लाख अपात्र लाभार्थ्यांनी 1364 कोटी रुपयांचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. यासंबंधी कृषी मंत्रालयानेही खुलासा केला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीची (Pradhan Mantri Kisan Sammann Nidhi) घोषणा 2019 मध्ये झाली. (pm modi scheme pm kisan govt distributed 1364 crores to undeserving beneficiaries)
या योजनेचा लाभ फक्त अशा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ज्यांची एकूण जमीन 2 हेक्टरपर्यंत आहे. यापेक्षा जास्त जमीन असल्यास किंवा शेतकऱ्यावर कर्ज असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासाठीच कृषी मंत्रालयाने अपात्र लाभार्थ्यांच्या दोन श्रेण्या तयार केल्या आहेत. पहिल्या प्रकारामध्ये 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणारे शेतकरी आणि दुसर्या प्रकारात कर भरणारे शेतकरी असं वर्गीकरण करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाभार्थ्यांच्या अपात्र यादीतील 45 टक्के शेतकरी पात्र नाहीत तर 55 टक्के शेतकरी हा करदाता आहे. पण यासाठी सरकार निधी वसूल करेल असा दावा करण्यात आला आहे. या योजनेस पात्र नसलेले बहुतेक शेतकरी हे मुख्य करून महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब आणि आसाममध्ये आहेत. यात सगळ्.ात जास्त पंजाबचे शेतकरी आहेत. दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आणि सिक्कीममधील फक्त एक शेतकरी या योजनेस पात्र नाही. या योजनेंतर्गत वर्षामध्ये तीन वेळा 2000-2000 रूपयातील तीन शेतकरी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतात.
तुमच्या खात्यात आले का 2000 रुपये ?
तुम्हीही जर पंतप्रधान किसान योजनेमध्ये पात्र शेतकरी असाल आणि पैसे तुमच्या खात्यात आले की नाही हे तपासून पाहायचं असेल तर खालीलप्रमाणे माहिती करून घ्या…
– यासाठी पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत pmkisan.gov.in वेबसाईटवर भेट द्या.
– यामध्ये तुम्हाला फार्मर असा बॉक्स दिले, तिथे जाऊन तुम्ही Beneficiary Status पर्यायावर क्लिक करा.
– यानंतर उघडलेल्या पेजवर आधार नंबर, बँक खातं किंवा मोबाईल नंबरमधून भरा.
– या तीन क्रमांकाच्या माध्यमातून तुम्ही खात्यावर पैसे आले की नाही हे तपासू शकता.
– तुम्हाला किती हप्त्याचे पैसे मिळाले आणि किती पैसे बाकी आहे याची सर्व माहिती यातून मिळेल.
– जर ‘FTO generated’ असं लिहून आलं असेल तर समजून घ्या की पैसे येणार आहेत.
– यासाठी 011-24300606 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करूनसुद्धा तुम्ही माहिती किंवा तक्रार नोंदवू शकता. (pm modi scheme pm kisan govt distributed 1364 crores to undeserving beneficiaries)
संबंधित बातम्या –
SBI अलर्ट | Instant Loan App पासून सावधान, पैशांची गरज असल्यास ‘हे’ करा
Gold Price Drop | सोन्याच्या भावात घसरण, सोनं-चांदी खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे भाव
(pm modi scheme pm kisan govt distributed 1364 crores to undeserving beneficiaries)