जल जीवन मिशन योजना कुठपर्यंत आली? वाचा 6 कोटी घरात पाणी पोहोचवण्यासाठी किती आला खर्च?
नवी दिल्ली : देशातील प्रत्येक खेड्यापाड्यातील घरात पाण्याचा नळ उपलब्ध करुन देण्याची मोठी योजना केंद्र सरकार राबवत आहे. आतापर्यंत प्रत्येक घरात नळ योजनेंतर्गत 6 कोटी घरांमध्ये नळ बसवण्यात आले आहेत. खरंतर, खेड्यांमधील पाण्याची टंचाई लक्षात घेता सरकारने ही योजना सुरू केली आहे. भारतात अजूनही अशी अनेक गावं आहेत जिथं लोकांना पाणी भरण्यासाठी विहिरीवर किंवा इतर […]
नवी दिल्ली : देशातील प्रत्येक खेड्यापाड्यातील घरात पाण्याचा नळ उपलब्ध करुन देण्याची मोठी योजना केंद्र सरकार राबवत आहे. आतापर्यंत प्रत्येक घरात नळ योजनेंतर्गत 6 कोटी घरांमध्ये नळ बसवण्यात आले आहेत. खरंतर, खेड्यांमधील पाण्याची टंचाई लक्षात घेता सरकारने ही योजना सुरू केली आहे. भारतात अजूनही अशी अनेक गावं आहेत जिथं लोकांना पाणी भरण्यासाठी विहिरीवर किंवा इतर ठिकाणी जावं लागतं. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये पाण्याचा नळ बसवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नात आहे. पण ही योजना नेमकी कुठपर्यंत आली आणि यासाठी किती खर्च करण्यात आला. यावर आज आपण नजर टाकणार आहोत. (pm narendra modi governments jal jivan mission yojna udpates)
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जल जीवन अभियानांतर्गत या योजनेसाठी 11,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात एकूण खर्च काढला असता तो वाढून 23,500 कोटींवर गेला आहे. यासाठी सरकारला अतिरिक्त रक्कमेची वाटप करावी लागली. समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, या योजनेंतर्गत भारतातील 278 लाख कुटुंबांमधील 6 कोटी लोकसंख्येला घरात शुद्ध पाणी देण्यात आलं आहे.
कोणत्या राज्यात मिळालं घरोघरी पाणी?
या योजनेंतर्गत गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करण्यात आली आहे. यासोबतच बिहार आणि तेलंगणासारख्या राज्यांमध्येही 2021 पर्यंत ही योजना पूर्ण क्षमतेनं कामाला लागेल. तर गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, मेघालय, पंजाब, सिक्कीम या राज्यांनी तर केंद्रशासित प्रदेशांनी 2022 मध्ये कामाला सुरुवात करण्याची योजना आखली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांमध्ये 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाचे पाणी उपलब्ध होईल असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
या प्रकल्पांवर सुरू आहे काम?
मोदी सरकारच्या या योजनेसाठी यूएन एजन्सी, गैर-सरकारी संस्था / सीबीओ, सीएसआर संस्था, ट्रस्ट, प्रतिष्ठानं अशा अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीसमवेत भागीदारी करण्यात आली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी 2024 पूर्वी मिशन पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.
2019 मध्येच झाली योजनेची घोषणा
15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घरात पाईपद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन अभियानाची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत देशातील प्रत्येक खेड्यातल्या घरात पाणी उपलब्ध होईल, असं सांगण्यात आलं होतं. (pm narendra modi governments jal jivan mission yojna udpates)
संबंधित बातम्या –
ASSOCHAM च्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण, पंतप्रधान मोदी करणार रतन टाटा यांचा पुरस्काराने सन्मान
(pm narendra modi governments jal jivan mission yojna udpates)