PN गाडगीळ ज्वेलर्स IPO ची धमाकेदार एंट्री, पहिल्याच दिवशी मोठा नफा

PN Gadgil IPO : आज पीएन गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ शेअर मार्केटमध्ये लिस्ट झालाय. गुंतवणूकदारांना आयपीओ सूचीबद्ध होताच जबरदस्त परतावा मिळालाय. सुमारे 74 टक्के प्रीमियमसह तो 834 रुपयांवर BSE वर सूचीबद्ध झालाय. त्याची IPO किंमत 480 रुपये होती. अशा स्थितीत, गुंतवणूकदारांनी लिस्टिंगवरच 350 रुपयांपेक्षा जास्त नफा कमावला.

PN गाडगीळ ज्वेलर्स IPO ची धमाकेदार एंट्री, पहिल्याच दिवशी मोठा नफा
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 4:04 PM

या आठवड्यात नवीन नवीन IPO ची एन्ट्री होत आहे. सोमवारी बजाज हाऊसिंग फायनान्सची लिस्टिंग झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध पीएन गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ आला आहे. मंगळवारी तो लिस्ट झालाय. लिस्ट झाल्यानंतर यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा नफा मिळाला आहे. जो बीएसईवर 73.75 टक्के प्रीमियमसह 834 रुपये आणि NSE वर 72.91 टक्के प्रीमियमसह 830 रुपयांवर सूचीबद्ध झाला. त्याची IPO किंमत 480 रुपये होती. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांनी लिस्टिंगवरच 350 रुपये नफा कमावला आहे. मात्र, लिस्टिंग झाल्यानंतर त्यात घसरण देखील दिसून आली.

या IPO ला एकूण 59 पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. कंपनी IPO द्वारे मिळालेल्या पैशांचा वापर महाराष्ट्रात 12 नवीन स्टोअर्स उघडण्यासाठी करणार आहे. याशिवाय यातून कर्जाची परतफेड देखील केली जाणार आहे. तसेच सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी देखील तो वापरला जाणार आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा महसूल वार्षिक 76 टक्क्यांनी वाढून 4507 कोटी रुपये झाला होता. कंपनीचा करानंतरचा नफा 35 टक्क्यांनी वाढून 94 कोटी रुपये झाला आहे.

ग्रे मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसाद

या IPO ला ग्रे मार्केट मध्ये उदंड प्रतिसाद मिळाला आहे. ज्या दिवशी IPO उघडला त्या दिवशी त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) 240 रुपये होता. अशा स्थितीत, सुमारे 50 टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध होणे अपेक्षित होते. यानंतर त्याचा जीएमपी वाढला आणि तो 303 रुपये झाला. म्हणजेच, ग्रे मार्केटनुसार, सुमारे 63 टक्के प्रीमियमसह तो 783 रुपयांमध्ये सूचीबद्ध होईल असे संकेत होते.

पीएन गाडगीळ ज्वेलर्स कंपनी विविध प्रकारच्या दागिन्यांचे व्यवहार करते. यामध्ये सोने, चांदी, प्लॅटिनम आणि डायमंड याचा समावेश आहे. थोडक्यात ते PNG ब्रँड म्हणून ओळखला जातो. कंपनीचे देशभरात 30 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. कंपनीची महाराष्ट्रात सर्वाधिक स्टोअर्स आहेत. अमेरिकेतही त्यांचे दुकान आहे.

जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.