घरं, दुकानं आणि प्लॉट स्वस्तात खरेदी करण्याची संधी, PNB बँकेकडून मालमत्तांचा लिलाव

PNB | देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेकडून मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. 12 ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

घरं, दुकानं आणि प्लॉट स्वस्तात खरेदी करण्याची संधी, PNB बँकेकडून मालमत्तांचा लिलाव
पीएनबी बँक
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 10:31 AM

मुंबई: तुम्ही एखादे घर किंवा दुकान स्वस्तात खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) यांच्याकडून सध्या काही मालमत्तांचा लिलाव केला जात आहे. यामध्ये तुम्हाला एखादे घर किंवा दुकान स्वस्तात खरेदी करता येऊ शकते. (PNB mega e auction give chance to get reasonable prices for residential and commercial property)

देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेकडून मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. 12 ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये तुम्हाला घरं, दुकानं आणि प्लॉट स्वस्त दरात खरेदी करता येतील. कर्ज न फेडता आल्यामुळे पीएनबी बँकेने काही कर्जदारांच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये 13700 रहिवाशी आणि 3088 व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. याशिवाय, 1541 औद्योगिक वास्तू आणि शेतीसंबंधी मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये एकूण 11 बँका सहभागी होणार आहेत.

लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी काय कराल?

* लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. * ऑनलाईन लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला अर्नेस्ट मनी डिपॉजिट म्हणजे EMD जमा करणे बंधनकारक आहे. * संबंधित बँकेच्या जवळच्या शाखेत तुमची कागदपत्रे जमा करणे बंधनकारक आहे. * लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ई-सिग्नेचर आवश्यक. * EMD आणि KYC जमा केल्यानंतर ई-ऑक्शन करणाऱ्या संस्थेकडून तुम्हाला ईमेल आयडी आणि लॉगिन पासवर्ड पाठवला जाईल. त्यानंतर तुम्ही पोर्टलवर लॉगिन करून ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

एअर इंडियाकडून तोटा भरुन काढण्यासाठी फ्लॅटसचा लिलाव

नुकताच एअर इंडियाकडून अशाप्रकारे मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता. या माध्यमातून कंपनीला झालेला तोटा भरून काढणे शक्य होणार आहे. त्यासाठी एअर इंडिया (Air India) मुंबई आणि दिल्लीतील काही अलिशान मालमत्ता विकण्यात आल्या.

संबंधित बातम्या: 

आता चुकलात तर स्वस्तात घर, दुकान खरेदी करण्याची संधी हुकेल, आजपासून बंपर ऑफर

स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी; एअर इंडिया करणार मालमत्तेचा लिलाव, ऑनलाईन बोली लागणार

(PNB mega e auction give chance to get reasonable prices for residential and commercial property)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.