नोकरदारांसाठी PNB ची धमाकेदार ऑफर, ‘हे’ खातं उघडल्यास पैसे नसतानाही मिळतील 3 लाख रुपये

मुंबई : देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) नोकरी करणाऱ्यांसाठी खास ऑफर आणली आहे. बँकेने पीएनबी माय सॅलेरी अकाऊंट खाते (PNB My Salary Account) कामगारांसाठी सुरू केले आहे. या खात्यावर अनेक सुविधा उपलब्ध आहेत. पीएनबीने या वेतनाचे खाते चार प्रकारांमध्ये विभागले आहे. सिलव्हर, गोल्ड, प्रीमियम आणि प्लॅटिनम. पगाराच्या वेतनमानाच्या आधारे हे […]

नोकरदारांसाठी PNB ची धमाकेदार ऑफर, 'हे' खातं उघडल्यास पैसे नसतानाही मिळतील 3 लाख रुपये
Punjab National Bank Internet Banking
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 8:27 AM

मुंबई : देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) नोकरी करणाऱ्यांसाठी खास ऑफर आणली आहे. बँकेने पीएनबी माय सॅलेरी अकाऊंट खाते (PNB My Salary Account) कामगारांसाठी सुरू केले आहे. या खात्यावर अनेक सुविधा उपलब्ध आहेत. पीएनबीने या वेतनाचे खाते चार प्रकारांमध्ये विभागले आहे. सिलव्हर, गोल्ड, प्रीमियम आणि प्लॅटिनम. पगाराच्या वेतनमानाच्या आधारे हे विभागले गेले आहे. हे खाते उघडल्यानंतर ग्राहकांना आणखी बरेच फायदे मिळणार आहेत. (pnb my salary account give upto 3 lakhs rs overdraft here is all details)

हे खाते उघडल्यानंतर खातेधारकांना तीन लाख रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधेसह 20 लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मिळेल. पीएनबीने ट्वीट केले आहे की तुम्हाला पगार चांगल्या प्रकारे टिकवायचा असेल तर PNBMySalaryAccount उघडा. यामध्ये तुम्हाला वैयक्तिक अपघात विम्यासह ओव्हरड्राफ्ट आणि स्वीप सुविधा मिळवा.

प्रत्येक महिन्याला तुम्हाला जो पगार मिळणार त्या आधारे हे खातं असेल. दरमहा 10 हजार ते 25 हजार पगार सिलव्हरच्या वर्गात ठेवण्यात आले आहेत. 25001 ते 75000 पर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना गोल्डमध्ये तर 75001 ते 1,50,000 रुपये प्रीमियममध्ये मोडण्यात आलं आहे. ज्यांना 150001 रुपयांपेक्षा जास्त पगार मिळाला आहे त्यांना प्लॅटिनम प्रकारात मोडण्यात आलं आहे.

कोण उघडू शकते खाते ?

पीएनबी वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे खाते केंद्र, राज्य सरकार, पीएसयू, सरकारी-निम-सरकारी कॉर्पोरेशन, MNCs प्रख्यात संस्था, कॉर्पोरेट किंवा शैक्षणिक संस्थेत कार्यरत नियमित कामगार उघडू शकते. कराराच्या आधारे काम करणारे कर्मचारी हे खाते उघडण्यास पात्र नसतील.

PNB MySalary Account च्या खास गोष्टी

– सॅलरी अकाऊंट जीरो बॅलेंसनेही सुरू केलं जाऊ शकतं.

– या खात्यामध्ये मिनिमम क्वाटर्ली एव्हरेज बॅलेंस ठेवण्याची गरज नाही.

– यामध्ये नॉमिनेशनची सुविधा उपलब्ध आहे.

– सिल्वव्हरमध्ये 10,000 -25,000 रुपये मासिक सॅलरी आहे.

– गोल्डमध्ये 25,001 ते 75,000 रुपये महिन्याला सॅलरी आहे.

– प्रीमियममध्ये 75,001 ते 1,50,000 रुपये सॅलरी आणि प्लेटिनममध्ये 1,50,001 पेक्षा जास्त सॅलरी आहे.

– रिटेल इंटरनेट बँकिंग आणि एसएमएस अलर्टसाठी कुठलाही चार्ज घेतला जाणार नाही

– 20 लाख रुपयांपर्यंत मोफत वैयक्तिक अपघात विमा.

– ओव्हरड्राफ्ट आणि स्वीपची सुविधा.

– सिल्वव्हरसाठी 40 चेकबुक, गोल्ड 50, प्रीमियमसाठी वर्षाला 100 तर प्लेटिनमसाठी अनलिमिटेड चेकबुक देण्यात आले आहेत. (pnb my salary account give upto 3 lakhs rs overdraft here is all details)

संबंधित बातम्या – 

SBI Alert : आज UPI Payment नाही करू शकणार SBI यूजर्स, बँकेची महत्त्वाची माहिती

Petrol Diesel Price : ऐन महागाईत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महागलं? वाचा आजचे ताजे दर

LIC ची प्रसिद्ध पॉलिसी, दरवर्षी 2500 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा 5 लाखांचा फायदा

(pnb my salary account give upto 3 lakhs rs overdraft here is all details)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.