AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani : खिशात नसते दमडी, क्रेडिट कार्डची तर बातच सोडा, जगातील धनाढ्याची काही औरच कथा!

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्या खिशात कधीच पैसे नसतात. क्रेडिट कार्ड ही नसते. विश्वास बसणार नाही, पण आता हे त्यांनीच सांगितले म्हटल्यावर...

Mukesh Ambani : खिशात नसते दमडी, क्रेडिट कार्डची तर बातच सोडा, जगातील धनाढ्याची काही औरच कथा!
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 4:55 PM

नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) देशातच नाही तर जगात लोकप्रिय आहेत. हुरुन ग्लोबलच्या श्रीमंतांच्या यादीत (Hurun Global Rich List) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited) चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी सर्वात अग्रेसर आहेत. या यादीत टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत (Billionaire) त्यांची जागा मजबूत आहे. हुरुनच्या रिपोर्टनुसार, आरआईएलचे (RIL) प्रमुख, अंबानी यांच्या संपत्तीत 20 टक्के घसरण झाली आहे. तरीही त्यांच्याकडे 82 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह ते जगातील अब्जाधीशमध्ये 9 व्या स्थानी आहे. सलग तिसऱ्या वर्षी आशियातील ते सर्वात धनाढ्य व्यक्ती (Richest Asian) ठरले आहेत

पण याच एका कारणामुळे ते सध्या सोशल मीडियावर (Social Media) ते लोकप्रिय झाले आहेत. काही दिवसांपासून मुकेश अंबानी यांचा एक जुना व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ त्यांच्या मुलाखतीचा आहे. त्यात एका प्रश्नाला त्यांनी दिलेले उत्तर सध्या खूप व्हायरल होत आहे. त्यांना विचारण्यात आले होते, की त्यांच्यासाठी पैसे किती महत्वाचा आहे, त्यावर त्यांनी दिलेले उत्तर सर्वांनीच ऐकण्यासारखं आहे.

हे सुद्धा वाचा

मुकेश अंबानी हे विनम्र आणि विनयशील असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी सांगितले की, लहानपणापासून ते आतापर्यंत खिशात कधीच पैसा ठेवत नसल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे क्रेडिट कार्डही नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बिल पेमेंट करताना त्यांच्यासोबत नेहमी कोणी ना कोणी असते. त्यांच्या मते, पैसा त्यांच्यासाठी एक उत्पन्नाचा स्त्रोत आहे. पैसा स्त्रोत म्हणून त्यांच्या कंपनीची जोखीम उचलतो.

आता जगातील, आशियातील धनाढ्य व्यक्तीकडे क्रेडिट कार्ड पण (Credit Card) नाही, हे उत्तर तुम्हाला पचनी पडणार नाहीच नाही. मुकेश अंबानी ज्या पद्धतीने हलके स्मित करुन या प्रश्नांची उत्तरे देत आहेत, ते पाहून सोशल मीडियावर युझर्सचा सुद्धा त्यांच्यावर विश्वास नसल्याचे दिसून येते. या व्हायरल व्हिडिओवर कॉमेन्टसचा पाऊस पडला आहे. एका युझरने कॉमेंट केली आहे की, मला, ही मुकेश अंबानी इतकेच श्रीमंत कर.

मुकेश अंबानी यांचा हा इंटरव्ह्यू अत्यंत जुना आहे. हा व्हिडिओ स्टॉक एज्युकेशन या नावाने एका इंस्टाग्राम प्रोफाईलवर जवळपास 15 दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर हा हा म्हणता लोकप्रिय झाला. या व्हिडिओला आतापर्यंत 3 अब्जहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.