15 ऑगस्टपासून बँक खात्याशी संबंधित हा नियम बदलणार, हे काम करा अन्यथा पेमेंट थांबणार

आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून बँकेने कळवले आहे की, 15 ऑगस्ट 2021 पासून 2 लाख किंवा त्याहून अधिकच्या चेकवर सकारात्मक वेतन प्रणाली (PPS) लागू केली जाईल.

15 ऑगस्टपासून बँक खात्याशी संबंधित हा नियम बदलणार, हे काम करा अन्यथा पेमेंट थांबणार
indian bank
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 7:38 AM

नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 जानेवारी 2021 पासून चेकद्वारे पेमेंटमधील फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकारात्मक वेतन प्रणाली लागू केली होती. पण आता 15 ऑगस्टपासून ते अनिवार्य करण्यात येणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय बँकेने आपल्या ग्राहकांना याबाबत अलर्ट पाठवणे सुरू केलेय. आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून बँकेने कळवले आहे की, 15 ऑगस्ट 2021 पासून 2 लाख किंवा त्याहून अधिकच्या चेकवर सकारात्मक वेतन प्रणाली (PPS) लागू केली जाईल.

आरबीआयकडून सकारात्मक पेमेंट प्रणालीबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी

वास्तविक मोठ्या प्रमाणावर चेक फसवणुकीच्या प्रकरणांनंतर आरबीआयने सकारात्मक पेमेंट प्रणालीबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. हे 1 जानेवारी 2021 पासून देखील लागू केले गेले. RBI ने बँकांना सांगितले आहे की, ही सुविधा 50,000 किंवा त्याहून अधिकचे धनादेश देणाऱ्या सर्व खातेधारकांसाठी लागू केली जाईल.

चेकद्वारे 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम भरणे आवश्यक

बँका त्यांच्या वतीने 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेसाठी ही सुविधा अनिवार्य करू शकतात, असंही RBI ने म्हटले होते. RBI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, इंडियन बँकेने चेकद्वारे 2 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम भरल्यावर ही सुविधा लागू केली आहे. इंडियन बँक आता ही सुविधा 15 ऑगस्टपासून अनिवार्य करणार आहे.

पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टम म्हणजे काय?

पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टीम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) विकसित केलीय. या प्रणालीअंतर्गत जास्त प्रमाणात व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या धनादेशांविषयी काही महत्त्वाची माहिती बँकेला द्यावी लागते. यानंतर या चेकचे पेमेंट क्लिअर करताना हे तपशील जुळतात. काही विसंगती किंवा तपशीलांमध्ये जुळत नसल्यास पेमेंट थांबवले जाते.

चेक पेमेंटबाबत बँकेला कोणती माहिती देणे आवश्यक?

इंडियन बँकेने म्हटले आहे की, ग्राहकांना त्यांचा खाते क्रमांक, चेक क्रमांक, जारी करण्याची तारीख, व्यवहार कोड, एमआयसीआर कोड बँकेकडे द्यावा लागेल. हे तपशील चेक क्लिअरिंगला पाठवण्यापूर्वी 24 तास आधी शेअर करावे लागतील. बँक ग्राहक वेबसाईट, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग किंवा होम ब्रँचला भेट देऊन ही माहिती देऊ शकतात.

संबंधित बातम्या

सीएनजी पंप उघडून करा भरघोस कमाई, कंपनी ‘या’ शहरांमध्ये देतेय संधी

मुकेश अंबानींना SC चा धक्का; Amazon-Future करारात मोठा निर्णय

positive payment systems to be mandatory in indian bank from 15th august

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.