दिलासादायक! शेअरबाजारातील पडझडीला ब्रेक; सेन्सेक्स 700 अंकांनी उसळला

गेल्या आठवड्यात झालेल्या पडझडीतून शेअर बाजार सावरल्याचे चित्र आहे. आज शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्समध्ये मोठी उसळी पहायला मिळाली. आज सेन्सेक्स तब्बल सातशे अंकानी वधारला आहे.

दिलासादायक! शेअरबाजारातील पडझडीला ब्रेक; सेन्सेक्स 700 अंकांनी उसळला
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 11:10 AM

मुंबई : गेल्या आठवड्यात झालेल्या पडझडीतून शेअर बाजार सावरल्याचे चित्र आहे. आज शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्समध्ये मोठी उसळी पहायला मिळाली. आज सेन्सेक्स तब्बल सातशे अंकानी वधारला आहे. बँकिंग, ऑटोमोबाईल, मेटल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी  आली आहे. एचडीएफसी, इन्फोसिस, यांचे शेअर्स  टॉपवर आहेत. सध्या स्थितीमध्ये सेन्सेक्स 487 अकांच्या वाढीसह 57,552 अंकांवर स्थिरावला आहे. तर दुसरीकड निफ्टीमध्ये देखील 147 अकांची वाढ झाली आहे.

बँकिंग, ऑटो क्षेत्रात तेजी

शेअर्समधील खरेदी वाढत असून, गुंतवणूकदार बँकिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला सर्वाधिक पसंती देत आहेत. याचाच परिणाम म्हणून ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी असल्याचे पहायाला मिळत आहे. त्या पाठोपाठ बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूक देखील वाढली आहे. बँकिंग क्षेत्रातील शेअर 1.48 टक्क्यांनी वाढले आहेत.

गेल्या आठवड्यात मंदी

दरम्यान गेल्या आठवड्यात ओमिक्रॉनच्या सावटाखाली जागतिक शेअरबाजार झाकोळून गेला होता. ओमिक्रॉनच्या बातम्यांमुळे सेन्सेंक्समध्ये मोठी पडझड झाल्याची पहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये तब्बल 16 हजार अंकांची घसरण झाली होती. परंतु मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये या आठवड्यात शेअरबाजारासाठी दिलासादायक वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. आज शेअर मार्केट सुरू होताच. सेन्सेक्समध्ये तब्बल 700 अंकांची वाढ पहायला मिळाली.

संबंधित बातम्या

ज्या भारतीय सीईओंचा जगभर डंका; ते अग्रवाल, नाडेला, पिचाई नेमके कमवतात किती?

दिलासा नाहीच! गॅस सिलिंडर पुन्हा महागले; आता मोजावी लागणार इतकी किंमत

ट्विटरचे CEO म्हणून ज्यांची जगभर चर्चा, त्या पराग अग्रवाल यांचा नेमका पगार किती? कुठे कुठे काम केलंय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.