Post Office मध्ये धमाकेदार योजना, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 40 हजारांचा फायदा; झटपट तुम्हीही करा संधीचं सोनं
मागील काही काळामध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग योजनांविषयी लोकांचे आकर्षण वाढले आहे. स्वत: पंतप्रधान मोदींनीही इंडिया पोस्टच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे.
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी पोस्ट ऑफिसला बरीच प्रसिद्धी दिली आहे. मागील काही काळामध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग योजनांविषयी लोकांचे आकर्षण वाढले आहे. स्वत: पंतप्रधान मोदींनीही इंडिया पोस्टच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. येथे तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो. त्या बरोबरच तो खूप सुरक्षित मानला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा योजनेविषयी सांगणार आहोत जिथे 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षानंतर ही रक्कम 1 लाख 40 हजारांच्या जवळ जाईल. (Post Office invest 1 lakh national saving certificates get 40 thousands interest)
National Savings Certificates ही वन टाईम गुंतवणूक आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मुदतपूर्ती कालावधी 5 वर्षे आहे. ही योजना सध्या 6.8 टक्के व्याज दर देते, जे चक्रवाढ व्याज आहे आणि वार्षिक आधारावर गणना करते. यामध्ये मॅच्यूरिटिनंतरही व्याज दिले जाते. या योजनेत किमान 1000 रुपये आणि 100 रुपयांचे गुणक जमा केले जाऊ शकतात. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. कलम 80सी अंतर्गत पैसे गुंतवून तुम्हाला कपात करण्याचा फायदा मिळतो. कलम 80 सीची मर्यादा 1.5 लाख रुपये आहे.
6.8 टक्के व्याजदर
रिटर्नविषयी बोलायचं झालं तर, यामध्ये व्याज दर 6.8 टक्के झाला आहे. सरकार प्रत्येक तिमाहीत व्याज दराचा आढावा घेते. गुंतवणूकदारांना वार्षिक आधारावर चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. याअंतर्गत तुम्ही 1000 रुपये गुंतवल्यास पाच वर्षानंतर तुमची रक्कम 1389.49 रुपये होईल. म्हणजे व्याज उत्पन्न 389.49 रुपये होते. अशाप्रकारे, 10 हजार रुपये गुंतवणूकीचे व्याज उत्पन्न 3890 रुपये आणि 1 लाख रुपये 38949 रुपये व्याज म्हणून गुंतवणूकीचे आहे.
Post Office मध्ये अकाऊंट असेल तर 1 एप्रिलपासून नियम
जर तुमच्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकांनी आता AEPS (आधार आधारित पेमेंट सिस्टम) वर शुल्क आकरण्याचा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू करण्यात येणार आहे. मूलभूत बचत खातं असल्यास महिन्यातून चार वेळा पैसे काढणं विनामूल्य आहे. त्यानंतर प्रत्येक व्यवहारावरील शुल्क म्हणून किमान 25 रुपये किंवा मूल्याच्या 0.50 टक्के कपात केली जाईल. (Post Office invest 1 lakh national saving certificates get 40 thousands interest)
संबंधित बातम्या –
ICICI बँकेचा धमाका, दहा वर्षातील सर्वात स्वस्त Home Loan
LIC मध्ये करा 1 लाखाची गुंतवणूक, एकत्र 20 लाख परत मिळण्याची गॅरंटी
Gold Silver Price : सोनं-चांदी झाली स्वस्त; वाचा पुढे सोनं वधारेल की आणखी घसरेल
(Post Office invest 1 lakh national saving certificates get 40 thousands interest)