या मोबाईल अॅपद्वारे Post Office मध्ये उघडा खातं, घर बसल्या होईल काम
पोस्ट ऑफिस ग्राहकांना आयपीपीबी मोबाइल अॅपद्वारे (IPPB Mobile App) ऑनलाइन बँकिंग सुविधा देत आहे.
नवी दिल्ली : जर तुम्हालाही पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही मोबाईल अॅपवरून डिजिटल सेव्हिंग खातं (Digital Saving Account) उघडू शकता. पोस्ट ऑफिस ग्राहकांना आयपीपीबी मोबाइल अॅपद्वारे (IPPB Mobile App) ऑनलाइन बँकिंग सुविधा देत आहे. यामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये खातं असलेले लोक इंडियास्ट पेमेंट बँकेद्वारे घरातूनच आर्थिक व्यवहार करू शकतात. (post office online account open account through ippb mobile app for more benefits)
कसं उघडाल IPPB Mobile App द्वारे खातं?
– इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खातx उघडण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्ष असणं महत्त्वाचं आहे.
– अर्जदार भारतीय नागरिक असणं महत्त्वाचं आहे
– सगळ्यात आधी तुमच्या फोनमध्ये IPPB Mobile Banking App डाउनलोड करा.
– आता यामध्ये ‘Open Account’ वर क्लिक करा.
– यानंतर विचारलेली सर्व माहिती भरा.
– माहिती भरून क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर OTP येईल. तो भरा.
– आता यामध्ये पालकांचे नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि नॉमिनी इत्यादी माहिती भरा.
– यानंतर सबमिटवर क्लिक करा.
– तुमचं अकाऊंट ओपन झालं असेल.
जुन्या खात्याला असे बदला जनधन खाद्यामध्ये…
जर एखाद्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर ते तुम्ही जनधन खात्यात ट्रान्सफर करू शकता. याची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला बँक शाखेत जाऊन रुपे कार्डसाठी अर्ज करावा लागेल आणि फॉर्म भरल्यानंतर तुमचे बँक खाते जनधन योजनेत ट्रान्सफर होईल. अशात तुम्हाला जर जनधन योजनेंतर्गत बँक खातं उघडायचं असेल तर तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत उघडू शकता. खातं उघडण्यासाठी कोणत्याही बँकेच्या वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करून भरावा लागेल. संबंधित कागदपत्रं जोडल्यानंतर तुमचं खातं उघडलं जाईल.
अशात तुम्हाला जर जनधन योजनेंतर्गत बँक खातं उघडायचं असेल तर तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत उघडू शकता. खातं उघडण्यासाठी कोणत्याही बँकेच्या वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करून भरावा लागेल. संबंधित कागदपत्रं जोडल्यानंतर तुमचं खातं उघडलं जाईल.
असा मिळेल लाखोंना फायदा
जनधन खात्यात ओव्हरड्राफ्ट सुविधेसह रुपे डेबिट कार्डची सेवादेखील उपलब्ध आहे. या डेबिट कार्डवर 1 लाख रुपये अपघात विमा मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ग्राहकांनी 28.8.2018 नंतर खातं उघडलं आहे त्यांचा अपघात विमा वाढवून 2 लाख करण्यात आला आहे. याशिवाय कार्डवर 30,000 रुपयांचे विनामूल्य जीवन विमा संरक्षण देण्यात आले आहे. (change your saving bank account to jan dhan account get benefits of lakhs)
जनधन खाते आधारशी करा लिंक
सर्व खातेधारकांचा आधार नंबर 31 मार्च 2021 पर्यंत लिंक करून घेण्याच्या सूचना अर्थमंत्री (Minister) निर्मला सीतारमण (nirmala sitharaman) यांनी बँकांना दिल्या होत्या. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, ज्या खात्यांमध्ये पॅन नंबर (Pan card Number) आवश्यक आहे तिथे पॅन नंबर आणि जिथे आधार नंबर (aadhaar Card Number) महत्त्वाचा आहे तिथे आधार नंबर 31 मार्च 2021 पर्यंत लिंक असला पाहिजे. इतकंच नाही तर 2.30 लाख रुपयांचा फायदा हवा असेल तर प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये (Pradhan Mantri Jan-Dhan Yojana- PMJDY) वेळीच आपलं खातं उघडा आणि आधारशी लिंक करा असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं होतं. (post office online account open account through ippb mobile app for more benefits)
संबंधित बातम्या –
आपल्या व्हॅलेंटाईन किंवा पत्नीला ATM कार्ड देण्यापूर्वी काळजी घ्या; अन्यथा मोठं नुकसान
अन्यथा Deactivate होईल तुमचं पॅन कार्ड, आयकर विभागाने दिली महत्त्वाची माहिती
घरात पडून असलेल्या सोन्यातून लाखो कमाव, काय आहे SBI ची खास Gold Scheme ?
(post office online account open account through ippb mobile app for more benefits)