Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office Scheme : पोस्टाची तगडी स्कीम, दररोज 138 रुपये वाचवा, 23 लाख मिळवा, तब्बल 10 लाखांचा बोनस

तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात पण कुठे करावं हे तुम्हाला समजत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करुन देत आहोत (post office RPLI scheme will give you high returns).

Post Office Scheme : पोस्टाची तगडी स्कीम, दररोज 138 रुपये वाचवा, 23 लाख मिळवा, तब्बल 10 लाखांचा बोनस
बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये फसवणूक झाल्यास काय करावे?
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 8:00 PM

मुंबई : तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात पण कुठे करावं हे तुम्हाला समजत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करुन देत आहोत. गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिस हे एक चांगलं आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे. देशभरातील लाखो महिला, कष्टकरी माणसं पोस्टातील विविध योजनांअंतर्गत पैशांची गुंतवणूक करतात. पोस्टातील अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेविषयी माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (post office RPLI scheme will give you high returns).

योजनेचं नाव नेमकं काय?

या योजनेचं नाव सुमंगल रुरल पोस्टल लाईफ इन्शूरन्स स्कीम असं आहे. ही योजना ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी आहे. विशेष म्हणजे या योजनेत तुम्हाला विमा देखील मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला आवश्यक असेल तेव्हा निश्चित रक्कमही मिळेल. या योजनेअंतर्गत तुम्ही दररोज 138 रुपये भरुन 23 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळवू शकता (post office RPLI scheme will give you high returns).

योजनेविषयी माहिती

या योजनेची सुरुवात 1995 मध्ये झाली. या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस सहा वेगवेगळ्या वीमा विमा योजना सादर करतं. या योजनेअंतर्गत सम एश्योर्ड रक्कम ही 10 हजार रुपये आणि अधिकाधीक रक्कम ही 10 लाख रुपये इतकी आहे. पॉलिसी पूर्ण होईपर्यंत वीमाधारक जिवंत असेल तर त्या व्यक्तीला मनीबँकचा देखील फायदा होईल. या व्यतिरिक्त जर वीमाधारकाचा मृत्यू झाला तर वारसाला सम एश्योर्ड रकमेसह बोनस दिला जातो.

योजनेसाठी निकष काय?

या योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी कमीतकमी वय 19 आणि जास्तीत जास्त वय हे 45 असणं गरजेचं आहे. सुमंगल योजनेसाठी दोन पर्याय आहेत. यापैकी एक पर्याय हा 15 वर्ष तर दुसरा पर्याय हा 20 वर्षांचा आहे. तुम्ही जर 15 वर्षांची पॉलिसी घेतली तर तुम्हाला 6, 9 आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकी 20 टक्के मनी बँकचा लाभ मिळेल. त्याचबरोबर मॅच्यूरिटीच्या वेळी बोनससोबतच उर्वरित 40 टक्के रक्कम मिळेल. याशिवाय तुम्ही 20 वर्षांची पॉलिसी घेतली तर तुम्हाला 8, 12, 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकी 20 टक्के पैसे मिळतील. इतर रक्कम 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळेल. याशिवाय त्यावर बोनस देखील दिला जाईल.

या योजनेता फायदा नेमका काय?

एखादी व्यक्ती 25 वर्षाच्या वयात 20 वर्षांची पॉलिसी घेत असेल आणि 10 लाख रुपये सम एश्योर्ड रक्कम असेल तर त्या व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 4150 रुपये भरावे लागतील. याचा अर्थ दररोज त्या व्यक्तीला 138 रुपयांची बचत करावी लागेल. या व्यक्तीला नियमांनुसार 8, 12, 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 20 टक्के रक्कम म्हणजेच प्रत्येकी 2 लाख रुपये मिळतील. त्यानंतर 20 वर्षांनी 4 लाख रुपये रक्कम सम एश्योर्डच्या रुपात मिळेल. या रकमेवर 65 रुपयांच्या हिशोबाने प्रती हजार वार्षिक बोनस मिळेल. 10 लाख रुपयांच्या एश्योर्ड रकमेवर 65 हजार रुपयांचा बोनस दर वर्षाला मिळेल. याचा अर्थ 20 वर्षात तुम्हाला 13 लाख रुपये बोनस म्हणून वेगळे मिळतील. म्हणजेच या योजनेअंतर्गत तुम्हाला जवळपास 23 लाख रुपये मिळतील.

हेही वाचा : Gold Silver Rate Today | रुपयात घसरण झाल्याने सोन्याचे भाव वधारले, जाणून घ्या आजचा दर

धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा.
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?.
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं.
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया.
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका.
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा.