Money: पोस्ट ऑफिसच्या 5 बचत योजनांमध्ये पैसे गुंतवा, कमी कालावधीमध्ये पैसे दुप्पट होणार
1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी व्याज दर कायम ठेवण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये छोट्या बचत ठेवींसाठी जुनेच व्याज दर लागू होतील. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या काही योजनांचा देखील समावेश आहे.
नवी दिल्ली: केंद्र सरकारनं 2021-22 या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीसाठी व्याज दरांची घोषणा केली आहे. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी व्याज दर कायम ठेवण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये छोट्या बचत ठेवींसाठी जुनेच व्याज दर लागू होतील. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या काही योजनांचा देखील समावेश आहे. पोस्टाच्या या योजनांमध्ये तुम्ही पैसे जमा करुन तुमचे पैसे दुप्पट करु शकता. पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगले पैसे मिळतात. यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांचा घेतलेला आढावा. (Post Office Saving Schemes kisan vikas patra nsc sukanya samridhi yojana ppf know all details about scheme)
किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra)
किसान विकास पत्र अल्प बचत योजना आहे. या योजनेला भारतीय पोस्टने 1988 मध्ये लाँच केले होते. दीर्घ काळासाठी लोकांनी यात गुंतवणूक करावी असा या योजनेचा उद्देश होता. या योजनेत कमीत कमी एक हजार रुपये गुंतवावे लागतात. या योजनेसाठी अधिकाधिक मर्यादा नाही. सरकारने 2014मध्ये या योजनेअंतर्गत पॅनकार्ड अनिवार्य केले होते. मात्र 50 हजार रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्यास पॅनकार्ड अनिवार्य आहे. जर 10 लाखांहून अधिक गुंतवणूक केली तर उत्पन्नाचा पुरावा, सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट किंवा इनकम टॅक्स रिटर्न सोबत जोडावे लागते. सध्या या योजनेत पैसे गुंतवल्यास तुमचे पैसे 124 महिन्यात म्हणजेच 10 वर्ष 4 महिन्यात दुप्पट होतात. यावर सध्या 6.9 टक्के व्याज मिळते, तर आयकरामध्ये 80C तून सूट मिळते.
नॅशनल सेविंग्ज प्रमाणपत्र (National Savings Certificate)
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेची मुदतपूर्ती 5 वर्षे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वाच्या गरजांसाठी तुम्ही अटी आणि नियमांचं पालन करत 1 वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधीनंतरही तुमची रक्कम काढू शकता. आर्थिक वर्षाच्या प्रत्येक तिमाहीच्या सुरूवातीस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील व्याज दर सरकार ठरवते. ही योजना इतकी खास आहे की यामध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांनीही गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेंतर्गत दरवर्षी 6.8 टक्के व्याज दिलं जातं. खास गोष्ट म्हणजे या योजनेत आयकर कलम 80Cसी अंतर्गत तुम्हाला वर्षाकाठी दीड लाख रुपयांची कर सूट देखील मिळू शकते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 100, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 आणि 10,000 रुपयांचे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीलाही मर्यादा नाही. या योजनेत सुरुवातीला पैसे मोजावे लागतात सुरुवातीला तुम्ही 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.8 टक्के व्याज मिळेल. म्हणजेच 5वर्षानंतर तुम्हाला 20.85 लाख रुपये म्हणजे 21 लाख रुपये मिळतील.
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)
पोस्ट ऑफिस किंवा बँकाद्वारे बऱ्याच योजना राबवल्या जातात. ज्यात तुम्ही गुंतवणूक करुन तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते. यातील एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. ही योजना आपण पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. (Sukanya Samriddhi Yojana All details) या योजनेत तुम्हाला 7.60 टक्के व्याज मिळतो. विशेष म्हणजे या योजनेत आपण कमीत कमी 250 रुपये रक्कम गुंतवू शकता. एवढ्या कमी किंमतीत मिळणाऱ्या योजनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेत जर तुम्ही 15 वर्षांसाठी 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 21 वर्षानंतर 66 लाख रुपये मिळतील. ही योजना खास मुलींसाठी आहे. यात मुलीच्या नावावर एकच खाते उघडता येणार आहे. तसेच यात तुम्हाला 80 सी अंतर्गत करात सूट मिळते. हे सर्व फायदे पाहता यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund Account)
पीपीएफमध्ये कोणीही गुंतवणूक करु शकतो. पण अशा स्थितीत जर तुमची मुलगी लहान असेल तर तिच्या भविष्यासाठी कुठे गुंतवणूक केली पाहिजे, असा प्रश्न निर्माण होतो. सद्यस्थितीत पीपीएफवर 7.1 टक्के व्याज मिळतो. यात तुम्ही एका आर्थिक वर्षात कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करु शकता. अल्पवयीन मुलीच्या नावे त्याचे पालक हे खाते उघडू शकतात. हे खाते 15 वर्षांत मॅच्युअर होते. यानंतर 5 वर्षापर्यंत ते वाढवता येऊ शकते. म्हणजेच समजा तुमच्या मुलीचे वय आता 5 वर्ष आहे आणि जर तुम्ही तिच्या नावे पीपीएफ खाते उघडले. त्यात तुम्ही दरवर्षी 1 लाख रुपये जमा केले तर 15 वर्षानंतर ती रक्कम सध्याच्या व्याजदर (7.1 टक्के) नुसार 27.12 लाख होईल. म्हणजे तुम्ही 15 वर्षांत जमा केलेली रक्कम ही 15 लाख रुपये असेल. मात्र जेव्हा तुमची मुलगी 21 वर्षांची असेल, तेव्हा तिच्या खात्यात 27 लाख 12 हजार 139 इतकी रक्कम जमा होईल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme)
Senior Citizen Saving Scheme ही पाच वर्षांच्या कालावधीसाठी योजनात आहे. यामध्ये तुम्ही कितीही खाती उघडून गुंतवणूक करु शकता. मात्र, SCSS योजनेतंर्गत एकूण गुंतवणुकीसाठी 15 लाखांची मर्यादा आहे. केंद्र सरकार या योजनेचा व्याजदर प्रत्येक तिमाहीत निश्चित करते. सध्याच्या एप्रिल-जून तिमाहीत SCSS योजनेचा व्याजदर 7.4 टक्के इतका आहे. तुम्ही या योजनेत एकदा पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला पाच वर्ष व्याज मिळत राहते. मात्र, हे उत्पन्न करपात्र असते.
संबंधित बातम्या:
SIP ची भन्नाट योजना, 3 लाखांची गुंतवणूक करा आणि 11 लाख कमवा
SBI कडून ज्येष्ठ नागरिकांना मोठं Holi गिफ्ट, FD वर दिली धमाकेदार सुविधा
Post Office Saving Schemes kisan vikas patra nsc sukanya samridhi yojana ppf know all details about scheme