जुलै-ऑगस्टमध्ये पुन्हा वीज संकट?… पावसाळ्यापूर्वीच पुन्हा कोळशाचा साठा तळाला, खाणकाम प्रक्रियेत अडचणी
रिसर्च ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार, जुलै आणि ऑगस्टमध्ये देशात पुन्हा पॉवर क्रायसिस निर्माण होण्याचा धोका वर्तविण्यात आला आहे. पिटहेड पॉवर स्टेशन्सजवळ कोळशाचा साठा 13.5 मिलियन टनच्या जवळपास आहे. तर देशातील जवळपास सर्वच पॉवर प्लांट्सजवळ एकूण साठा 20.7 मिलियन टन इतका आहे.
देशावर पुन्हा एका वीजेचे संकट (Power crisis) निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वीच पॉवर प्लांटमध्ये कोळशाच्या साठ्यात कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे वीज संकट अधिकच गडद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. रिसर्च ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार, जुलै आणि ऑगस्टमध्ये (July-August) देशात पुन्हा पॉवर क्रायसिस निर्माण होण्याचा धोका वर्तविण्यात आला आहे. पिटहेड पॉवर स्टेशन्सजवळ कोळशाचा साठा 13.5 मिलियन टनच्या जवळपास आहे. तर देशातील जवळपास सर्वच पॉवर प्लांट्सजवळ एकूण साठा 20.7 मिलियन टन इतका आहे. रिपोर्टनुसार, जर विजेच्या मागणीत थोडी जरी वाढ झाली तर पॉवर प्लांट्स त्या मागणीला पूर्ण करु शकणार नाहीत. अशा परिस्थितीपासून वाचण्यासाठी कोळशांचा साठा (coal) अत्यंत गरजेचा आहे. जर पावसाळ्यापूर्वी कोळशाचा साठा उपलब्ध राहिला नाही, तर ऐन पावसाळ्यात वीज संकट निर्माण होउ शकते.
सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी ऑफ इंडियाचा असा अनुमान आहे की, ऑगस्ट महिन्यात देशाची पॉवर डिमांड 214 गीगावॅटपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. सोबतच सरासरी विजेची मागणी वाढून 133426 मिलियन युनिटपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. साउथ वेस्ट मान्सून आल्यावर कोल माइनिंग आणि ट्रांसपोर्टेशनवर परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत पॉवर स्टेशन्सजवळील कोळशाचा साठा संपण्याची शक्यता आहे. जर हा साठा वेळीच वाढवला नाही तर जूलै ऑगस्टमध्ये पॉवर क्राइसिस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एक रिपोर्टनुसार, कोल माइनिंग पुरेशा प्रमाणात झाल्यानंतरही ट्रांसपोर्टेशन आणि सिनर्जीच्या अभावामुळे थर्मल पॉवर प्लांट्सच्या जवळ कोळशाचा भंडार मर्यादीत राहिला आहे. आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये देशातील कोळसा निर्मिती 777.26 मिलियन टन राहिले आहे. तर वर्ष 2020-21 मध्ये ही आकडेवारी 716.08 मिलियन टन राहिली होती. सरासरी वर्षांमध्ये यात 8.54 टक़्के वाढ दिसून आली आहे.
वर्ष 2021-22 मध्ये प्रोडक्शन कपॅसिटी 1500 मिलियन टन होती, ज्यातील केवळ 77.26 मिलियन टनाचेही खनन करण्यात आले होते. अशात कोळशाची निर्माण होणारी टंचाई साहजिकच आहे. CREA चे विश्लेषक सुनील दहिया यांनी सांगितले, की जर कोल कंपन्यांचे प्रोडक्शन वाढले तर, या कोळसा टंचाईचा सामना करणे शक्य होणार आहे. मे 2020 पासूनच देशातील पॉवर प्लांटस्मधील साठा सतत घसरत आलेला आहे.
पावसाळ्यात खदानीत जाते पाणी
पावर प्लांट्सने आपल्या कोळसा साठ्यांकडे लक्ष न दिल्याने 2021 मध्येही मोठ्या प्रमाणात पॉवर क्राइसिस निर्माण झाला होता. अशात आता पावसाळ्यापूर्वी कोळसा टंचाईमुळे पॉवर प्रोडक्शन बंद होण्याच्या संकटात आहे.
पावसाळ्यात कोळसा खदानींमध्ये पाणी भरले जात असते. त्यामुळे अनेक दिवस खनन प्रक्रियाही बंद असते. याशिवाय ट्रांसपोर्टेशनलाही अनेक अडचणी येत असतात.