10 वर्षाच्या मुलांच्या नावावर दररोज 15 रुपये जमा करुन 28 लाख मिळवण्याची संधी, वाचा सविस्तर

काही पालक त्यांचा मुलगा आणि मुलगी लहान असतानाचं त्यांच्या नावानं गुंतवणुकीला सुरुवात करतात. PPF account investment

10 वर्षाच्या मुलांच्या नावावर दररोज 15 रुपये जमा करुन 28 लाख मिळवण्याची संधी, वाचा सविस्तर
Representational Image
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 11:40 AM

नवी दिल्ली: लहान मुलांच्या भविष्याबद्दल अनेक पालक गांभीर्यानं विचार करत असतात. मुलांचं शिक्षण, नोकरी, लग्न अशा गोष्टींचा विचार पालकांकडून केला जात असतो. काही पालक त्यांचा मुलगा आणि मुलगी लहान असतानाचं त्यांच्या नावानं गुंतवणुकीला सुरुवात करतात. पालकांनी केलेल्या या गुंतवणुकीचा फायदा मुलांना होतो. पब्लिक प्रॉविडंट फंड म्हणजेच पीपीएफ ही एक चांगली योजना आहे. मुलांच्या नावानं गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली संधी आहे. पीपीएफ खाते काढल्यानंतर त्यामध्ये नियमितपणे रक्कम जमा करणं आवश्यक असून त्यानंतरचं योजनेचे फायदे मिळू शकतात.(PPF account open on name of minor child deposit 500rs per month and get 28 lakh)

पीपीएफ योजनेत किती पैसे गुंतवायचे?

पीपीएफ योजनेत पैसे कसे गुंतवायचे हे आपण एका उदाहरणानुसार समजून घेऊ. समजा तु्ही तुमच्या 10 वर्षाच्या मुलीच्या नावानं पीपीएफ अकाऊंट काढलं आणि दरमहा 500 रुपये म्हणजेच दररोज 15 ते 17 रुपये बचत करुन गुंतवणूक करता येईल. पीपीएफ खात्यात मुलीच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत गुंतवणूक सुरु ठेवता येईल. 7 टक्के व्याजासह त्यावेळी 27 लाख 86 हजार 658 रुपये मिळतील.

22 व्या वर्षी पीपीएफ खाते काढल्यास

समजा मुलीनं 22 व्या वर्षी नोकरी सुरु केली आणि तिनं तिच्याकडून पीपीएफ खात्यात रक्कम टाकण्यास सुरुवात केली. मुलीनं दरमहा 1 हजार रुपयांची गुंतवणूक सुरु केल्यास. पुढील 38 वर्षे दरमहा गुंतवणूक सुरु ठेवल्यास, 7 टक्के व्याजाच्या हिशोबानं तिला 23 लाख 72 हजार 635 रुपये मिळतील.

लगेच पीपीएफ खाते उघडा

अधिक परतावा हवा असेल तर पीपीएफ खाते लवकर काढावे असा सल्ला दिला जातो. आई-वडील त्यांच्या एकाच मुलाच्या नावावर पीपीएफ खाते काढू शकतात. खाते उघडण्यासाठी मुलीचे आई-वडील भारतीय नागरीक असणं आवश्यक आहे.यासाठी केवायसी देखील अपडेट करावी लागते. आई वडिलांचा मुलीसह असणारा फोटो अपलोड करावा लागतो. पीपीएफ अकाऊंट सुरु करताना सुरुवातीचे हप्ते चेकद्वारे भरावे लागतात.

कर बचतीचा फायदा

पालक मुलांच्या नावानं काढलेल्या पीपीएफ अकाऊंटमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करु शकतात. पीपीएफमधील गुंतवणुकीद्वारे कर बचत देखील करता येते.

संबंधित बातम्या:

PHOTOS : Bitcoin चे दिवस संपले? एका दिवसात किमतीत 10 टक्क्यांची घट, हॅकिंगसोबतही नावाची चर्चा

कर्जाची परतफेड करण्याआधीच कर्जदाराचं निधन झालं तर त्या लोनचं नेमकं काय होतं? जाणून घ्या सविस्तर

(PPF account open on name of minor child deposit 500rs per month and get 28 lakh)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.