PPF आणि NPS कशात सर्वाधिक फायदा? जाणून घ्या निवृत्तीनंतरची सर्वोत्तम योजना

निवृत्तीनंतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून त्याआधीच बचत आणि योग्य गुंतवणुकीची गरज असते.

PPF आणि NPS कशात सर्वाधिक फायदा? जाणून घ्या निवृत्तीनंतरची सर्वोत्तम योजना
money
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 4:38 AM

नवी दिल्ली : निवृत्तीनंतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून त्याआधीच बचत आणि योग्य गुंतवणुकीची गरज असते. तसं पाहिलं तर चांगल्या परताव्याचा दावा करणाऱ्या अनेक योजना बाजारात आहेत. मात्र, या सर्व योजनांवर विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे कोणत्या योजनेत पैशांची गुंतवणूक अधिक सुरक्षित आणि फायदेशीर असेल याचाही विचार करणं महत्त्वाचं ठरतं. यात बहुतांश लोकांचा विश्वास सरकार योजनांवर असतो. तुमचाही विश्वास सरकारी योजनांवरच असेल तर तुमच्यासाठी पीपीएफ (PPF) आणि एनपीएस (NPS) हे चांगले पर्याय आहेत. या दोन्ही योजनांमध्ये चांगला परतावा मिळतो (PPF and NPS Know which scheme is more beneficiary to invest for post retirement days).

पीपीएफचे फायदे

अगदी छोट्या रकमेच्या बचतीमधून मोठी रक्कम साठवण्यासाठी पब्लिक प्राविडंट फंड म्हणजेच PPF अकाऊंट चांगला पर्याय आहे. यात आयकर कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या मर्यादेत सूट मिळते. ही एक सुरक्षित आणि हमीपूर्ण परतावा देणारी गुंतवणूक योजना आहे. पीपीएफ अकाउंटचा उपयोग करुन कर्ज घेण्याचीही सुविधा आहे. तुम्ही जमा झालेल्या रकमेवर 25 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकता. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आधी कर्जाची मूळ रक्कम फेडावी लागते.

एनपीएसचे फायदे

एनपीएस म्हणजे नॅशनल पेंशन सिस्टम (NPS – National Pension System). ही योजना PFRDA च्या वतीने चालवली जाते. यात इक्विटी एक्‍सपोजर असते. येथे गुंतवणूक केल्यास वयाच्या 60 व्या वर्षी एकरकमी पैसे मिळतात. यात गुंतवणूक करण्यासाठी संबंधित व्यक्तीचं वय 18 ते 65 वर्षे असावं लागतं. एनपीएसमध्ये गुंतवणुकीचे दोन पर्याय आहेत. एक टियर-1 आणि दुसरा टियर-2. या योजनेत 1,000 रुपयांपासून खातं सुरू करता येतं.

कोणती योजना अधिक फायदेशीर?

एनपीएसमधील गुंतवणुकीवर 10 टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा मिळतो. दुसरीकडे पीपीएफमध्ये 7.1 टक्के परतावा मिळतो. याचा विचार करता एनपीएस अधिक फायदेशीर आहे. कारण पीपीएफच्या तुलनेत तेथे 2.9 टक्के अधिक नफा मिळतो.

हेही वाचा :

सुकन्‍या योजनेसह छोट्या बचत ठेवीदारांना मोठा झटका बसणार? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

फक्त 500 रुपयात पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडा खातं, काही वर्षात मिळेल बक्कळ परतावा

अर्थमंत्री मॅडम, एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते? शिवसेनेचा सणसणीत टोला

व्हिडीओ पाहा :

PPF and NPS Know which scheme is more beneficiary to invest for post retirement days

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.