Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PPF CALCULATOR: पीपीएफ खात्यात रोज गुंतवा 250 रुपये; 25 वर्षांनंतर व्हा मालामाल, 62 लाख रुपयांचा घसघशीत परतावा

 वयाच्या महत्वपूर्ण टप्प्यात 62 लाख रुपये परतावा मिळवायचा असेल तर पीपीएफ खात्यात दररोज 250 रुपये गुंतवणूक करा. जाणून घ्या काय आहे गणित 

PPF CALCULATOR: पीपीएफ खात्यात रोज गुंतवा 250 रुपये; 25 वर्षांनंतर व्हा मालामाल, 62 लाख रुपयांचा घसघशीत परतावा
संग्रहित फोटो
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 12:56 PM

मुंबई : दीर्घकालीन गुंतवणूक योजनेत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी  (PPF) हा  गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे.  या योजनेची सरकार हमी घेते.उच्च उत्पन्न देणारी, अल्प बचत योजना भारतातील सर्वात लोकप्रिय आहे. जी निवृत्तीनंतर गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी मदत करते. अर्थ मंत्रालयाच्या राष्ट्रीय बचत संस्थेने 1968 मध्ये पहिल्यांदा पीडीएफ योजना सादर केली. तेव्हापासून पीपीएफ हे भारतीयांसाठी एक शक्तिशाली साधन बनले आहे. या योजनेत  गुंतवणुकदारांना कर लाभ मिळतो.  सुरक्षा, भरघोस परतावा आणि कर लाभांमुळे गुंतवणूकीचा सर्वात चांगला पर्याय म्हणून या गुंतवणूक योजनेकडे पाहिले जाते.केंद्र सरकारच्या हमीमुळे ही आजघडीला १०० टक्के जोखीम मुक्त गुंतवणूक आहे आणि या योजनेत शेअर बाजारातील घडामोडींचा कुठलाही परिणाम होत नाही. शेअर बाजारातील उलथापालथीचा कसलाची जोखीम या योजनेला बसत नाही.

आपल्या पीपीएफ खात्यातून जास्तीत जास्त फायदे कसे मिळवावे?

मार्गदर्शक तत्त्वांनुसार गुंतवणूकदार सलग तब्बल 15 वर्षे  पीपीएफ खात्यात  पैसे गुंतवू शकतात. परंतु, जर एखाद्याला 15 वर्षांच्या अखेरीस पैशाची आवश्यकता नसेल, तर गरजेनुसार पीपीएफ खात्याचा कार्यकाळ वाढविता येतो. या कालमर्यादा वाढीसाठी अर्ज भरून द्यावा लागतो.  ही योजना EEE नियमाच्या कक्षेत येणाऱ्या काही योजनांपैकी एक आहे. या योजनेत गुंतवणूक बंद झाली तरी रक्कम काढण्याची घाई करू नका. कारण नियमांआधारे तुम्ही कर पात्र ठरतात. हा जास्तीचा फायदा तुम्हाला मिळतो. सध्या  पीपीएफवर 7.1 टक्के  व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. सध्या व्याजदर सर्वाधिक असून त्याला सरकारची हमी आहे.  जर तुम्ही वर्षाला दीड लाख रुपये 15 वर्षांसाठी गुंतवले, तर कालावधी पूर्ण झाल्यानंतर  तुम्हाला जवळजवळ 41 लाख रुपये मिळतात.

दिवसाला 250 रुपये गुंतवा, पीपीएफकडून 62 लाख रुपये मिळवा

जर तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यात दिवसाला 250 रुपये गुंतवले, तर महिनाअखेर 7,500 रुपये जमा होतात. याचा अर्थ असा की, दरवर्षी तुम्ही तुमच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यात 91,000 रुपयांपेक्षा थोडी जास्त गुंतवणूक करत आहात.वयाच्या 25 व्या वर्षापासून वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत म्हणजे 25 वर्षांपर्यंत हे करत राहिलात, तर योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर  तुम्हाला मिळणारी रक्कम तब्बल 62.5 लाख रुपये असेल. ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असेल आणि मिळणारे एकूण व्याज सुमारे 40 लाख असेल. आपण 25 वर्षांत जमा केलेली एकूण रक्कम 22.75 लाख रुपये होईल.

परंतु, जर आपण इतकी मोठी रक्कम गुंतवू शकत नसाल, तर आपल्याला कमी रक्कमेत या योजनेत सहभागी होता येईल. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी गुंतवणूकीच्या बाबतीत लवचिक आहे.  गुंतवणुकदार त्यांच्या खात्यात दरवर्षी 500 रुपयांपर्यंत कमी गुंतवणूक करू शकतात. पीपीएफ खाती ऑनलाइन उघडली जाऊ शकतात किंवा नजीकच्या बॅंकेत जाऊन तुम्ही पीपीएफ खाते उघडू शकता.

इतर बातम्या :

सुरक्षित गुंतवणुकीचा ‘साथी’दार: सेबीचं डिजिटल पाऊल, नवं अ‍ॅप लवकरच मराठीत!

मार्केट ट्रॅकर : नव्या वर्षातला पहिला आयपीओ बाजारात, इश्यू प्राईस ते लिस्टिंग जाणून घ्या!

Gold Price Today : दिल्लीत सोन्याची घौडदोड, पन्नास हजारांचा टप्पा पार, महाराष्ट्रातील प्रमुख शहरात काय भाव ?

फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.