31 मे पर्यंत बँक खात्यात 342 रुपये ठेवा, अन्यथा 4 लाखांच्या फायद्यावर पाणी!
PMJJBY आणि PMSBY या दोन्ही योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळतं. जर तुम्ही सरकारच्या या योजनांचा लाभ घेतला असेल, तर तुम्हाला या महिन्यात तुमच्या बँक खात्यात 342 रुपये ठेवणं आवश्यक आहे.
नवी दिल्ली : कोरोना काळात केंद्र सरकारच्या योजना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) या दोन योजना तुम्हाला उपयोगी पडू शकतात. PMJJBY आणि PMSBY या दोन्ही योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळतं. जर तुम्ही सरकारच्या या योजनांचा लाभ घेतला असेल, तर तुम्हाला या महिन्यात तुमच्या बँक खात्यात 342 रुपये ठेवणं आवश्यक आहे. अन्यथा तुमचं 4 लाखांचं नुकसान होऊ शकतं. (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana and Pradhan Mantri Suraksha Bima Yojana keep rs 342 in your saving account for 4 lakh insurance cover)
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना या दोन्ही योजनांचे हप्ते, हे खातेधारकाच्या बचत खात्यातून आपोआप कापले जातात. एका व्यक्तीचं एकच बचत खातं या योजनेसाठी पात्र ठरतं.
4 लाख रुपयांचा विमा
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) या अंतर्गत 4 लाख रुपयांचा विमा मिळतो. PMJJBY या योजनेनुसार वयाच्या 55 वर्षापर्यंत जीवसुरक्षेचा लाभ मिळतो. हा एकप्रकारे टर्म इन्शुरन्स आहे, जो दरवर्षी रिन्यू अर्थात नूतनीकरण करावं लागतं. जर विमाधारकाचा मृत्यू झाला, तर नातेवाईक सरकारकडे 2 लाख रुपयांसाठी क्लेम करु शकतात. या योजनेंअतर्गत अन्य आजारांसह आता कोरोना महामारीचाही समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे जर खातेधारकाचा मृत्यू कोरोनाने झाला, तरीही कुटुंबाला विमा रकमेवर दावा करता येतो. ही योजना दरवर्षी रिन्यू होते. या योजनेचा वार्षिक हप्ता (प्रीमियम) 330 रुपये असतो.
12 रुपयात 2 लाखांचं विमाकवच
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) 18 ते 70 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना लागू होऊ शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं बचत खातं असणे आवश्यक आहे. या योजनेनुसार, जर खातेधारकाचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, 2 लाखाचा अपघात विमा मिळतो. कायमस्वरुपी अंशता अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचं कवच मिळतं. या योजनेचा वार्षिक हप्ता 12 रुपये आहे.
या योजनेचा फायदा कोण घेऊ शकतं?
18 ते 50 वयोगटातील व्यक्ती तप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा (PMJJBY) लाभ घेऊ शकतात. तर पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) 18 ते 70 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना लाभ मिळू शकतो.
अर्ज कसा करावा?
जर तुम्हाला या योजनेअंतर्गत विमा पॉलिसी घ्यायची असेल, तर थेट कोणत्याही बँकेत जाऊन अर्ज करु शकता. याशिवाय बँक मित्र, विमा एजेंट किंवा सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांद्वारे या योजनांमध्ये गुंतवणूक करु शकता.
जर वेळेत हप्ता न भरल्यास तुमची पॉलिसी रद्द होते, पुन्हा रिन्यू होत नाही. प्रीमियम म्हणजेच या पॉलिसींचा हप्ता तुमच्या बँक खात्यातून ऑटो डेबिट म्हणजे आपोआप कट होतो. जर तुमच्या खात्यात हप्त्याचे पैसे नसतील तर तुमची पॉलिसी रद्द होऊ शकते. जर तुमचं बँक खातं बंद झालं असेल, तर त्या परिस्थितीतही पॉलिसी रद्द होऊ शकते.
संबंधित बातम्या
ही सरकारी बँक देतेय स्वस्तात घरं अन् दुकान खरेदीची संधी, 12 मे रोजी लिलाव
पतंजली बिस्किटचा व्यवसाय लवकरच रुचि सोयाच्या हाती, इतक्या कोटींचा होत आहे सौदा
(Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana and Pradhan Mantri Suraksha Bima Yojana keep rs 342 in your saving account for 4 lakh insurance cover)