वर्षभरात काळ्या मिऱ्याचे भाव 5 पटीने वाढले; जाणून घ्या दर वाढीमागील कारणे
तब्बल चार वर्षानंतर पुन्हा एकदा काळ्या मिऱ्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. काळ्या मिऱ्याचे दर 500 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
नवी दिल्ली – तब्बल चार वर्षानंतर पुन्हा एकदा काळ्या मिऱ्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. काळ्या मिऱ्याचे दर 500 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेली शिथिलता आणि सणासुदीचा काळ यामुळे मिऱ्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली, मागणी वाढल्याने किमती देखील वाढल्याचे पहायला मिळत आहे. मिऱ्याचे नवे उत्पादन बाजारात येईपर्यंत किमती आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यापारी आणि मिरे उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तवला आहे.
खराब हवामानाचा फटका
साधारणपणे मार्चमध्ये मिऱ्याचे नवे उत्पादन बाजारात येते. मात्र यावर्षी काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली, तर काही भागांमध्ये पाऊसच पडला नाही. खराब हवामानाचा फटका उत्पादनाला बसला असून, यावर्षी मिऱ्याचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी देखील मिऱ्याच्या भावामध्ये तेजी राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एका मसाला कंपनीच्या अधिकाऱ्याने याबाबत बोलताना म्हटले की, सध्या स्थितीमध्ये मिऱ्याची पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक वाढली आहे. लग्नसोहळा, पार्टी आणि अन्य कार्यक्रमाप्रसंगी बनवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात मिऱ्याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे मिऱ्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. विशेष: गुजरात, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये मिऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
आतंरराष्ट्रीय बाजारात भारतीय मिऱ्याला मागणी
भारत हा मिऱ्याचे उत्पादन घेणारा जगातील एक प्रमुख देश आहे. भारतीय काळ्या मिऱ्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असते. जूनपासून आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मिऱ्याचे भाव वाढले आहेत. सर्वाधिक मिऱ्याचे उत्पादन हे व्हिएतनाममध्ये होते. मात्र वातावरणीय बदलामुळे यंदा व्हिएतनाममधील उत्पादन घटले आहे. तर दुसरीकडे चीनमधून मिऱ्याची मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मिऱ्याचे भाव गगणाला भिडले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंडोनेशिया, व्हियतनाम, ब्राझिलमध्ये देखील मिऱ्याच्या किमतीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
आरोग्य विम्याचा क्लेम मिळाला नाही, तर ‘येथे’ करू शकता तक्रार, जाणून घ्या सर्व काहीhttps://t.co/78e1BPDkjc#HealthInsurance |#Claim |#Complain |#TPA
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 19, 2021
संबंधित बातम्या
ऑनलाईन विमा खरेदीला पंसती; वर्षभरात ग्राहकांची संख्या दुपटीने वाढली
Flipkart ची हेल्थकेअर सेक्टरमध्ये एन्ट्री; आता मागवता येणार ऑनलाइन औषधे
हवाई वाहतूक कोरोनापूर्व स्थितीमध्ये; प्रवाशांच्या संख्येत 71 टक्क्यांची वाढ