अर्थसंकल्प सादर करणारे भारताचे 5 पंतप्रधान कोण? अर्थसंकल्प सादर का करावा लागला? जाणून घ्या
दरवर्षी देशाच्या अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर केला जातो. पण अनेकदा असंही झालं आहे की, देशाच्या अर्थमंत्र्यांशिवाय देशाच्या पंतप्रधानांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. आज आम्ही तुम्हाला भारताच्या अशाच 5 पंतप्रधानांबद्दल सांगणार आहोत. यांनी पंतप्रधानपदावर असताना अर्थसंकल्प सादर केला आहे. जाणून घेऊया.

1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा आठवा अर्थसंकल्प असणार आहे. आता सरकार या अर्थसंकल्पात काय सादर करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रत्येक वेळी देशाच्या अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर केला जातो, पण अनेकदा असंही झालं आहे की, देशाच्या अर्थमंत्र्यांव्यतिरिक्त देशाच्या पंतप्रधानांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे.
आज आपण भारतातील अशा 5 पंतप्रधानांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर केला आहे किंवा अर्थसंकल्प सादर करून भारताचे पंतप्रधान बनले आहेत.
पंडित जवाहरलाल नेहरू
पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते. 1958 साली पंतप्रधानपदावर असताना त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी होते, पण चलन घोटाळ्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.
मोरारजी देसाई
मोरारजी देसाई 1959 पासून भारताचे अर्थमंत्री होते. त्यांनी भारतात अनेकवेळा अर्थसंकल्प सादर केला. मोरारजी देसाई 1977 साली भारताचे पंतप्रधान झाले.
इंदिरा गांधी
इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदावर असताना 1970 साली अर्थसंकल्पही सादर केला होता. त्यानंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या इंदिरा गांधी या भारतातील पहिल्या महिला ठरल्या.
राजीव गांधी
राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी अर्थसंकल्पही सादर केला होता. याचदरम्यान अर्थमंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले, ज्यामुळे राजीव गांधी यांनी 1987 साली अर्थसंकल्प सादर केला.
मनमोहन सिंग
मनमोहन सिंग यांनी 1997 ते 1996 या काळात अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर 2004 साली मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान झाले.
अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ
देशात दोन दशकांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प संध्याकाळी सादर करण्यात येत होता. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष आपण इंग्रजांची संध्याकाळी अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा जपली. संध्याकाळी 5 वाजता बजेट सादर करण्याची परंपरा वर्ष 2001 मधील एनडीए सरकारने सुरु केली. तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला आणि इंग्रजांची परंपरा मोडीत काढली. संध्याकाळी बजेट सादर करण्यामागे एक कारण होते. इंग्रज राजवटीत ब्रिटेनमध्ये सकाळी 11 वाजता बजेट सादर करण्यात येत होते. त्यात भारताच्या अर्थसंकल्पाचा पण भाग होता. तर संध्याकाळी त्याचवेळी भारतीय संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात येत होता. ही परंपरा स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष कायम होती.