निवृत्ती योजनेत गुंतवणुकीला प्राधान्य, एनपीएस आणि अटल पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत 23 टक्क्यांची वाढ

निवृत्ती योजनेबाबत (Retirement Schemes) नागरिकांची जागृतता दिवसेंदिवस वाढत आहे. पेन्शन फंड रेग्युलेटर (PFRDA) नुसार नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) आणि अटल पेन्शन (Atal Pension) योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वार्षिक आधारावर 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

निवृत्ती योजनेत गुंतवणुकीला प्राधान्य, एनपीएस आणि अटल पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत 23 टक्क्यांची वाढ
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 10:00 AM

निवृत्ती योजनेबाबत (Retirement Schemes) नागरिकांची जागृतता दिवसेंदिवस वाढत आहे. पेन्शन फंड रेग्युलेटर (PFRDA) नुसार नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) आणि अटल पेन्शन (Atal Pension) योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वार्षिक आधारावर 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत दोनही पेन्शन योजनेचा एकूण असेट 7.17 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी या योजनेतील एकूण गुंतवणूक 5.59 लाख कोटी रुपये इतकी होती. एनपीएस लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये चालू आर्थिक वर्षात 22.31 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 29 टक्क्यांनी वाढली आहे. दोनही योजना मिळून पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सरासरी 28 टक्क्यांची वाढ झाली आहे. निवृत्तीनंतरचा एक सुरक्षीत आधार आणि पैसे बचतीचा एक चांगला मार्ग म्हणून अनेक जण सध्या या योजनांमध्ये गुंतवणूक करत असल्याचे पहायला मिळत आहे.

लाभाची वयोमर्यादा

अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 40 वर्षांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. कमी वयात या योजनेंतर्गत बचतीला सुरुवात केल्यास एक चांगला परतावा तसेच पेन्शन तुम्हाला मिळू शकते. तुमचे वय जसजसे वाढत जाईल तसतसे तुम्हाला अधिक पैसे भरावे लागतात. अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर या योजनेचा लाभ घेता येत नाही.

योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन स्कीम ही एक चांगली योजना आहे. निवृत्तीनंतरचा आधार म्हणून या योजनेकडे पाहिले जाते. अनेकांचा पगार कमी असतो. कमी पगारात वृद्धापकाळासाठी बचत करून ठेवणे शक्य नसते. यासाठीच या दोन योजनांची निर्मिती करण्यात आली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच खासगी क्षेत्रात काम करणारा कोणताही कर्मचारी या योजनांचा लाभ घेऊ शकतो.

संबंधित बातम्या

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

आर्थिक अडचणीमध्ये गुंतवणुकीवर कर्ज घेणे कितपत फायदेशीर?; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

तुम्हालाही ऑनलाईन कर्ज हवे आहे? मग ही फिनटेक कंपन्यांची ‘डिजिटल दादागिरी’ एकदा बघाच

...म्हणून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा, त्या क्लिपवरून दमानिया संताप
...म्हणून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा, त्या क्लिपवरून दमानिया संताप.
सिद्धिविनायकाला जाताय? आता असा ड्रेस कोड असेल तरच मिळणार बाप्पाच दर्शन
सिद्धिविनायकाला जाताय? आता असा ड्रेस कोड असेल तरच मिळणार बाप्पाच दर्शन.
मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मुंडे स्पष्टच म्हणाले, '...ही माझी इच्छा'
मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मुंडे स्पष्टच म्हणाले, '...ही माझी इच्छा'.
लोकसभेपूर्वी भाजप-शिंदेंकडून ऑफर, ठाकरेंच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
लोकसभेपूर्वी भाजप-शिंदेंकडून ऑफर, ठाकरेंच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट.
'मी बीड जिल्ह्याचा बाप, चिंता काय...'; कराडचा आणखी एक ऑडिओ व्हायरल
'मी बीड जिल्ह्याचा बाप, चिंता काय...'; कराडचा आणखी एक ऑडिओ व्हायरल.
'लाडक्या बहिणींमुळे कोटींचा खड्डा, आता तुम्ही ठरवा मोदींच्या की...'
'लाडक्या बहिणींमुळे कोटींचा खड्डा, आता तुम्ही ठरवा मोदींच्या की...'.
'अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर...', दमानियांचं चॅलेंज
'अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर...', दमानियांचं चॅलेंज.
एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन
एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन.
सिद्दीकी प्रकरणात खुलासा, हत्येपूर्वी लिहिलेल्या डायरीत कोणाची नावं?
सिद्दीकी प्रकरणात खुलासा, हत्येपूर्वी लिहिलेल्या डायरीत कोणाची नावं?.
ऑनलाईन गेमच्या नादात स्वतःचा चिरला गळा, गुगलवर एकच शब्द सतत सर्च
ऑनलाईन गेमच्या नादात स्वतःचा चिरला गळा, गुगलवर एकच शब्द सतत सर्च.