‘या’ खासगी बँका बचत खात्यावर देतायत 6.75% पर्यंत व्याज, गुंतवणूक करण्यापूर्वी व्याजदर पाहा

बचत खाते असण्याचे अनेक फायदे आहेत, जसे तरलता, व्याज कमाई, निधीची सुरक्षा, बचत खाते आणि मुदत ठेवीदरम्यान ऑटो स्वीप सुविधेमुळे अतिरिक्त कमाई होते. तसेच देशातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका बचत खात्याची सुविधा देतात.

'या' खासगी बँका बचत खात्यावर देतायत 6.75% पर्यंत व्याज, गुंतवणूक करण्यापूर्वी व्याजदर पाहा
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 3:23 PM

नवी दिल्लीः फिक्स्ड डिपॉझिट हा सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. लोक सुरक्षित आणि निश्चित परताव्यामुळे FD मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. परंतु जेव्हापासून बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून लोकांनी त्यांचे पैसे बचत खात्यात ठेवण्यास सुरुवात केली. बचत खाते हे मूलभूत बँक खात्याचा एक प्रकार आहे, जे आपल्याला व्याज मिळवताना निधी जमा, ठेव आणि काढण्याची परवानगी देते.

बचत खाते असण्याचे अनेक फायदे आहेत, जसे तरलता, व्याज कमाई, निधीची सुरक्षा, बचत खाते आणि मुदत ठेवीदरम्यान ऑटो स्वीप सुविधेमुळे अतिरिक्त कमाई होते. तसेच देशातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका बचत खात्याची सुविधा देतात. छोट्या खासगी बँका नवीन किरकोळ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या बँकांपेक्षा बचत खात्यांवर जास्त व्याजदर देत आहेत.

जाणून घेऊया कोणत्या बँकांना जास्त व्याज मिळते

>> इंडसइंड बँक- इंडसइंड बँक बचत खात्यांवर 5 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. बचत खात्यात सरासरी मासिक शिल्लक आवश्यकता 1500 ते 10,000 रुपये आहे.

>> येस बँक- येस बँक बचत खात्यांवर 5.25 टक्के व्याजदर देत आहे. यामध्ये 10,000 ते 25,000 रुपये मासिक सरासरी शिल्लक राखणे आवश्यक आहे.

>> बंधन बँक- बंधन बँक बचत खात्यांवर 6 टक्के व्याज देते. बचत खात्यात मासिक सरासरी 5,000 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

>> आरबीएल बँक- आरबीएल बँक बचत खात्यांवर 6 टक्के व्याज देते, यासाठी खातेधारकांची मासिक सरासरी शिल्लक आवश्यकता 2,500 ते 5,000 रुपये आहे.

>> डीसीबी बँक- DCB बँक बचत खात्यांवर 6.75 टक्क्यांपर्यंत व्याज देते. ही बँक खासगी बँकांमध्ये सर्वाधिक व्याज देत आहे. यामध्ये 2,500 ते 5,000 रुपये मासिक सरासरी शिल्लक आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

PMGKY योजनेंतर्गत 6 कोटी टन अन्नधान्याचे वाटप; 80 कोटी लोकांना मोफत रेशन

पोस्टाची विशेष योजना; दरमहा 10 हजार जमा करा अन् 16 लाख मिळवा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.