….तर घरे 10 ते 15 टक्क्यांनी महागणार; ‘क्रेडाई’चा इशारा
घर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येणाऱ्या काळात घरांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते असा इशारा कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI)च्या वतीने देण्यात आला आहे.
मुंबई – घर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येणाऱ्या काळात घरांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते असा इशारा कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI)च्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत बोलताना क्रेडाईने म्हटले आहे की, घर बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. विशेष: सिमेंट आणि आणि स्टीलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही वाढ जर अशीच सुरू राहिली तर येणाऱ्या काळात घरांच्या किमती 10 ते 15 टक्क्यांनी वाढू शकतात.
सरकारने दर नियंत्रणासाठी प्रयत्न करावा
घरांच्या किमती वाढल्याचा मोठा फटका हा सर्वसामान्य ग्राहकांना बसू शकतो, तसेच कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत असल्यामुळे विकासकांचा देखील तोटा होत आहे. सरकारने बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न कारावा. कच्च्या मालावरील जीएसटी कमी केल्यास दर नियंत्रणात येऊ शकतात. अशी मागणी क्रेडाईच्या वतीने करण्यात आली आहे. जानेवारी 2020 पासून कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक बांधकाम प्रकल्प रखडले आहेत. मात्र आता कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने या प्रकल्पाचा खर्च देखील वाढला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा संबंधित विकासाला बसला असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
प्रकल्प रखडल्याने बांधकाम व्यवसायिक संकटात
संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत, येणाऱ्या काळात देखील त्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सरकारने बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कच्च्या मालाच्या किमती नियंत्रणात न आल्यास येणाऱ्या काळात घराच्या किमती या दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढू शकतात. याचा सर्वाधिक भार हा ग्राहकांवर पडणार आहे. तसेच कोरोनामुळे अनेक प्रकल्प रखडल्याने विकासकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
संबंधित बातम्या
बचतीचा सोपा मार्ग! ‘इथे’ करा गुंतवणूक; 21 वर्षांमध्ये मिळवा 1 कोटी रुपये