Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rafael Nadal Infosys : इन्फोसिसने खेळला Rafel शॉट! स्टार टेनिसपटूशी केला करार, बाजाराला सुखद धक्का

Rafael Nadal Infosys : स्टार टेनिसपटू राफेल नदाल आता इन्फोसिसच्या खेम्यात दाखल झाला आहे. या महान खेळाडूशी टेक कंपनीने तीन वर्षांसाठी करार केला आहे. कंपनी एक विशेष टूल आणत आहे, त्यादृष्टीने हे दोन दिग्गज ब्रँड एकत्र आले आहेत.

Rafael Nadal Infosys : इन्फोसिसने खेळला Rafel शॉट! स्टार टेनिसपटूशी केला करार, बाजाराला सुखद धक्का
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 5:43 PM

नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसने (IT Company Infosys) जबरदस्त खेळी खेळली आहे. कंपनीने एक हुकमी एक्का बाजारात उतरवला आहे. कंपनीने सर्वांनाच एक सुखद धक्का दिला. जगातील दिग्गज टेनिस स्टार राफेल नदाल (Rafael Nadal ) आता इन्फोसिसच्या खेम्यात दाखल झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी इन्फोसिसने त्याला ब्रँड ॲम्बेसिडर केले आहे. त्यासाठी तीन वर्षांचा करार करण्यात आला आहे. कंपनी लवकरच एक विशेष टूल बाजारात उतरविणार आहे. त्यादृष्टीने हा करार महत्वाचा ठरला आहे. राफेल नदालने या करारावर मन मोकळे केले आहे. इन्फोसिस जोडल्याचा आनंद त्याने व्यक्त केला. कंपन्या त्यांचे प्रोडक्ट लाँच करण्यासाठी खेळाडू, अभिनेते यांची मदत घेत असतात. त्यांना कंपनीचा ब्रँड ॲम्बेसिडर (Brand Ambassador) करतात.

राफेलचा चढता आलेख

स्पेनचे 37 वर्षीय राफेल नदाल हे टेनिसला पडलेले स्वप्न म्हणता येईल. हा स्टार टेनिसपटू एटीपी रँकिंग मध्ये 209 आठवड्यांपासून सलग पहिल्या स्थानावर आहे. त्याने 22 ग्रँड स्लॅब टूर्नामेंट्स जिंकल्या आहेत. 14 वेळा तो फ्रेंच ओपन टायटल्समध्ये सहभागी झाला आहे. गेल्या एक दशकापासून राफेल नदाल, रोजर फेडररसह टेनिस जगतात धुमाकूळ घालत आहे. तो एक महान खेळाडू आहे.

हे सुद्धा वाचा

कुटुंबात स्वागत

इन्फोसिस कुटुंबात राफेल नादेल यांचे स्वागत करण्यात आले. इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी सलील पारीख यांनी कंपनीचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून राफेल नदाल यांचे स्वागत केले. हा कंपनीचा गौरव आहे, कंपनीसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. नदाल हे लोकप्रिय टेनिसपटू तर आहेतच पण तो चांगला व्यक्ती असल्याने कंपनीसाठीही गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्यांदाच जोडल्या गेले

इन्फोसिसच्या डिजिटल इनोव्हेशनसाठी नदाल यांना करारबद्ध करण्यात आले आहे. हा करार तीन वर्षांसाठी करण्यात आला आहे. ते तीन वर्षांपर्यंत कंपनीचे राजदूत म्हणून असतील. एखाद्या डिजिटल सेवा कंपनीशी करार करण्याचा नदाल यांचा हा पहिलाच अनुभव आहे. या करारामुळे इन्फोसिसला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तीन वर्षाच्या काळात नदाल इन्फोसिसच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या दिसेल.

लाखो फॅनसाठी सुखद धक्का

एटीपी टूर, रोलँड-गॅरेस, ऑस्ट्रेलियन ओपन आणि दि इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेमसाठी इन्फोसिस डिजिटल इनोव्हेशन पार्टनर आहे. एआय, क्लाऊड, डेटा एनालिटिक्ससह क्रीडा प्रेमींना, राफेल नदालच्या लाखो फॅन्सला डिजिटल अनुभव घेता येणार आहे.

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा.
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट.
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का.
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा.
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”.
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली.
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल.
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?.
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे.
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?.