रेल्वेचा धार्मिक पर्यटनावर भर; ‘आयआरसीटीसी’ सुरू करणार ‘या’ नव्या ट्रेन

काही दिवसांपूर्वी आयआरसीटीसीच्या वतीने रामायण स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली होती. रेल्वेच्या या उपक्रमाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता धार्मिक पर्यटनासाठी आणखी काही स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वेचा धार्मिक पर्यटनावर भर; 'आयआरसीटीसी' सुरू करणार 'या' नव्या ट्रेन
आता खासगी व्यक्ती किंवा संस्थांना ट्रेन बूक करायला मंजुरी दिली गेली आहे.
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 7:10 AM

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी आयआरसीटीसीच्या वतीने रामायण स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली होती. रेल्वेच्या या उपक्रमाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता धार्मिक पर्यटनासाठी आणखी काही स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने सुरू होणाऱ्या  स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून शिख धर्मियांची सर्व महत्त्वाची पवित्र स्थळे जोडण्यात येणार आहेत. यासोबतच येणाऱ्या काळात आणखी काही अशा धार्मिक ट्रेन सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार असून, त्यासाठी एखाद्या खासगी कंपनीला देखील नियुक्त केले जाणू शकते.

बुद्ध स्पेशल ट्रेनची संख्याही वाढणार

रेल्वे विभागाकडून नुकतीच रामायण स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली होती, या ट्रेनला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रामायण ट्रेनला मिळालेला प्रतिसाद पाहाता आता रेल्वेकडून गुरु गोविंद सिंगजी स्पेशल ट्रेन सुरू करण्याची तयारी सुरू आहे. ही ट्रेन शिख धर्मियांच्या सर्व पवित्र स्थळांना जोडली जाणार आहे. या ट्रेनमुळे शिख बांधवांना कमी खर्चामध्ये आपल्या पवित्र स्थळांना भेट देणे शक्य होईल. या सोबतच सध्या सुरू असलेल्या बुद्ध स्पेशल ट्रेनची संख्या वाढवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला  आहे. भारतामध्ये धार्मिक पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळतो, हेच लक्षात घेऊन अधिकाधिक धार्मिक स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा विचार रेल्वे विभागाकडून सुरू आहे. या उपक्रमातून रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. धार्मिक स्थळांना जोडण्यात येणाऱ्या सर्व ट्रेन या सर्व सोईसुविधांनी युक्त अशा असणार आहेत.

 ‘अशी’ आहे रामायन स्पेशल ट्रेन 

दक्षिण भारतातील धार्मिक पर्यटन लक्षात घेत आयआरसीटीसीने श्री रामायण यात्रा-मदुरैची सुरुवात केली आहे. ही ट्रेन मदुराईपासून सुरु होऊ हम्पी, नाशिक, चित्रकूट, अलाहाबाद, वाराणसी जाईल आणि तिथून परत येईल. ही ट्रेन 16 नोव्हेंबरला रवाना झाली आहे. यात सांगण्यात आलं आहे की श्री रामायण यात्रा एक्सप्रेस-श्री गंगानगरहून 25 नोव्हेंबरला रवाना होईल. ही यात्रा एकप्रकारे धार्मिक हॉलिडे पॅकेज आहे. यात IRCTC तुम्हाला प्रभू श्रीरामाशी संबंधित धार्मिक स्थळांची यात्रा घडवेल.

आरामदायी आणि कमी बजेटमधील धार्मिक यात्रा’

जर तुम्ही रामायण सर्किटशी संबंधीत जागांवर जाऊ इच्छित असाल आणि धार्मिक पर्यटन करु इच्छित असताल तर हे पॅकेज तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. यात तुम्हाला कमी बजेटमध्ये आरामदायी प्रवास मिळेल. 6 दिवस आणि 5 रात्रीच्या या यात्रेला प्रति व्यक्ती एकूण खर्च 6 हजार 930 रुपये एवढा खर्च आहे.

संबंधित बातम्या 

‘एसबीआय’ची ग्राहकांसाठी खास ऑफर; गोल्ड लोन झाले स्वस्त, जाणून घ्या काय आहेत नवे व्याजदर?

बचतीचा सोपा मार्ग! ‘इथे’ करा गुंतवणूक; 21 वर्षांमध्ये मिळवा 1 कोटी रुपये

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी; आता क्रेडिट कार्डद्वारे EMI वर खरेदी करताय मग ही बातमी वाचा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.