रेल्वेने 11 विशेष गाड्या केल्या रद्द, 12 गाड्यांचा मार्ग बदलला, पटापट यादी तपासा

अशा परिस्थितीत ट्रेन चालवणे धोकादायक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूर्व मध्य रेल्वेने थलवाडा-हायाघाट विभागातून जाणाऱ्या काही गाड्या रद्द केल्यात, तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत.

रेल्वेने 11 विशेष गाड्या केल्या रद्द, 12 गाड्यांचा मार्ग बदलला, पटापट यादी तपासा
Indian Railways
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 1:47 PM

नवी दिल्लीः Indian Railways Cancelled Trains List: बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडल्यानंतर गंगा आणि त्याच्या उपनद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे. पुरामुळे एकीकडे जनजीवन विस्कळीत झालेय आणि दुसरीकडे रेल्वे आणि रस्ते वाहतूक सेवादेखील प्रभावित होत आहे. बिहारच्या समस्तीपूर-दरभंगा रेल्वे विभागावरील रेल्वेचे काम पुरामुळे विस्कळीत झाले. या विभागातील हायाघाट आणि थलवाडा स्टेशनदरम्यान असलेल्या रेल्वे पूल क्रमांक 16 जवळ पुराचे पाणी ट्रॅकवर आल्यानं दबाव वाढलाय.

…तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले

अशा परिस्थितीत ट्रेन चालवणे धोकादायक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूर्व मध्य रेल्वेने थलवाडा-हायाघाट विभागातून जाणाऱ्या काही गाड्या रद्द केल्यात, तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत. पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ राजेश कुमार म्हणाले की, गंतव्य स्थानकापूर्वी अनेक गाड्यांचे संचालन बंद केले जाईल आणि त्या बदल्यात तेथूनही गाड्या सुरू केल्या जातील.

4 सप्टेंबर 2021 रोजी विशेष गाड्या रद्द (Cancellation of trains)

1. 05554 जयनगर – भागलपूर विशेष ट्रेन 2. 05589 समस्तीपूर-दरभंगा विशेष ट्रेन 3. 05590 दरभंगा-समस्तीपूर विशेष ट्रेन 4. 05593 समस्तीपूर – जयनगर स्पेशल ट्रेन 5. 05594 जयनगर – समस्तीपूर स्पेशल ट्रेन 6. 05283 मणिहारी-जयनगर विशेष ट्रेन 7. 05284 जयनगर-मणिहारी विशेष ट्रेन 8. 03225 जयनगर-राजेंद्र नगर टर्मिनल स्पेशल ट्रेन 9. 03226 राजेंद्र नगर टर्मिनल – जयनगर स्पेशल ट्रेन 10. 03227 सहरसा-राजेंद्र नगर टर्मिनल स्पेशल ट्रेन 11. 03228 राजेंद्र नगर टर्मिनल – सहरसा स्पेशल ट्रेन

5 सप्टेंबर 2021 रोजी विशेष ट्रेन रद्द

1. 05553 भागलपूर-जयनगर विशेष ट्रेन

‘या’ गाड्यांचा मार्ग बदलला (Diversion of trains)

1. 04 सप्टेंबर 2021 रोजी 02569 दरभंगा-नवी दिल्ली ही दरभंगा येथून सुटणारी विशेष गाडी दरभंगा-सीतामढी-सिकटा-नरकटियागंज मार्गे वळवली जाईल. 2. 04 सप्टेंबर 2021 रोजी 02565 दरभंगा- नवी दिल्ली ही दरभंगाहून सुटणारी नवी दिल्ली विशेष गाडी दरभंगा – सीतामढी – सिकता – नरकटियागंज – गोरखपूर मार्गे वळवली जाणार आहे. 3. 03 सप्टेंबर 2021 रोजी 02566 नवी दिल्ली-दरभंगा नवी दिल्लीहून सुटणारी विशेष ट्रेन गोरखपूर-नरकटियागंज-सिकता-सीतामढी-दरभंगा मार्गे वळवली जाईल. 4. 03 सप्टेंबर 2021 रोजी 02570 नवी दिल्ली-दरभंगा नवी दिल्लीहून सुटणारी विशेष ट्रेन गोरखपूर-नरकटियागंज-सिकता-सीतामढी-दरभंगा मार्गे वळवली जाईल. 5. 03 सप्टेंबर 2021 रोजी 02562 नवी दिल्ली-दरभंगा विशेष ट्रेन नवी दिल्लीहून सुटणारी मुजफ्फरपूर-सीतामढी-दरभंगा या रूपांतरित मार्गाने वळवली जाईल. 6. 04 सप्टेंबर 2021 रोजी 02561 जयनगर – नवी दिल्ली जयनगर येथून सुटणारा विशेष मार्ग दरभंगा – सीतामढी – मुजफ्फरपूर मार्गे जाईल. 7. 04 सप्टेंबर 2021 रोजी 05235 हावडा-दरभंगा हा हावडाहून सुटणारा विशेष मार्ग समस्तीपूर-मुजफ्फरपूर-सीतामढी-दरभंगा मार्गे जाईल. 8. 03 सप्टेंबर 2021 रोजी 03043 हावडा-रक्सौल विशेष हावडाहून सुटणारी, समस्तीपूर-मुजफ्फरपूर-सीतामढी मार्गे वळवली जाईल. 9. 4 सप्टेंबर 2021 रोजी 03044 रक्सौल-हावडा स्पेशल रक्सौलहून सुटणारी सीतामढी-मुजफ्फरपूर-समस्तीपूर मार्गे वळवली जाईल. 10. 02 सप्टेंबर 2021 रोजी 07005 हैदराबाद-रक्सौल विशेष ट्रेन हैदराबादहून सुटणारी समस्तीपूर-मुजफ्फरपूर-सीतामढी मार्गे वळवली जाईल. 11. 05 सप्टेंबर 2021 रोजी 07006 रक्सौल-हैदराबाद स्पेशल रक्सौलहून सुटणारी सीतामढी-मुजफ्फरपूर-समस्तीपूर मार्गे वळवली जाईल. 12. 04 सप्टेंबर 2021 रोजी 05211 दरभंगा-अमृतसर विशेष दरभंगाहून सुटणारी ट्रेन दरभंगा-सीतामढी-सिकता-नरकटियागंज मार्गे वळवली जाईल.

गाड्यांची अल्प समाप्ती (Short termination of trains)

1. 03 सप्टेंबर 2021 रोजी 03185 सियालदाह – बरौनी ही सियालदाहून सुटणारी जयनगर विशेष ट्रेन बरौनी येथे संपुष्टात येईल. 2. 03 सप्टेंबर 2021 रोजी 04674 अमृतसर-जयनगर विशेष ट्रेन अमृतसर येथून सुटेल ती समस्तीपूर येथे अंशतः संपुष्टात येईल. 3. 03 सप्टेंबर 2021 रोजी 01061 लोकमान्य टिळक टर्मिनस- मुजफ्फरपूर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी जयनगर स्पेशल ट्रेन मुजफ्फरपूर येथे अंशतः संपुष्टात येईल. 4. 03 सप्टेंबर 2021 रोजी 04652 अमृतसर-जयनगर अमृतसरहून सुटणारी विशेष ट्रेन मुजफ्फरपूर येथे अंशतः संपुष्टात येईल.

गाड्यांची आंशिक सुरुवात: (Short termination of trains)

1. 04 सप्टेंबर 2021 रोजी 03186 जयनगर – सियालदाह जयनगरहून निघालेली सियालदाह स्पेशल जयनगरऐवजी बरौनीहून सियालदाकडे रवाना होईल. 2. 05 सप्टेंबर 2021 रोजी 04649 जयनगर – अमृतसर जयनगरहून सुटणारी विशेष गाडी जयनगरच्या ऐवजी समस्तीपूरहून अमृतसरला निघेल. 3. 05 सप्टेंबर 2021 रोजी 04651 जयनगर – अमृतसर जयनगरहून सुटणारी विशेष ट्रेन जयनगरच्या ऐवजी मुजफ्फरपूरहून अमृतसरला निघेल. 4. 05 सप्टेंबर 2021 रोजी 01062 जयनगर – लोकमान्य टिळक टर्मिनस जयनगरहून सुटणारी विशेष ट्रेन मुजफ्फरपूरहून जयनगरऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनससाठी निघेल.

संबंधित बातम्या

‘मला नट म्हणून घडवण्यात शाहीर साबळेंचा मोठा वाटा’, अभिनेते भरत जाधव यांनी शेअर केल्या आठवणी!

आम्ही समोरून कोथळा काढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही; राऊतांचा चंद्रकांतदादांवर पलटवार

Railways canceled 11 special trains, changed the route of 12 trains, check the inventory

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.