नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. कोरोनाचे सावट कमी झाल्याने, आता रेल्वे विभागाने देखील आपल्या प्लॅटफॉर्म तिकीटामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीटामध्ये वाढ करण्यात आली होती. प्लॅटफॉर्म तिकीट दहा रुपयांवरून 50 रुपये करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा तिकीटाचे दर 50 रुपयांहून दहा रुपये करण्यात आले आहेत, यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने ट्विट करत याबाबत माहिती दिली.
कोरोना काळात प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी वाढू नये यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हळूहळू कोरोनाचे सावट कमी होत आहे. लसीकरणाला देखील वेग आला आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा एकदा 50 हून दहा रुपये करण्यात आले आहे. सुरुवातीला काही ठराविक स्टेशनवर दहा रुपयात प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार आहे, त्यानंतर हळहळू ही सुविधा सर्व स्टेशनवर देण्यात येणार आहे. आजपासून नवे प्लॅटफॉर्म दर लागू झाले आहेत.
एवढेच नाही तर मध्ये रेल्वने मुंबई- पुणे आणि मुंबई – चेन्नई या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या संख्येत देखील वाढ केली आहे. मुंबई ते पुणेदरम्यान धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस दररोज धावणार आहे. ही ट्रेन सांयकाळी साडेसहाला मुंबईतून निघेल तर पुण्यात रात्री दहा वाजता पोहोचणार आहे. तसेच मुंबईहून इतर महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्यामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.
Reverting platform ticket to Rs 10 at CSMT, Dadar, LTT, Thane, Kalyan and Panvel stations @drmmumbaicr
The details are ? pic.twitter.com/EDt5E7A9EF— Central Railway (@Central_Railway) November 24, 2021
संबंधित बातम्या
‘या’ राज्यात जुनी वाहने ठेवणे होणार महाग; ग्रीन टॅक्समध्ये भरमसाठ वाढ
‘ही ‘ विदेशी कंपनी करणार एक हजार अभियंत्यांची भरती; मिळणार मोठे पॅकेज
फोन बिघडल्यावर दुरुस्तीसाठी कंपनीचा सर्व्हिस मॅनेजर घरी येणार, सेवा पूर्णपणे मोफत