रेल्वे लवकरच Special Trains थांबवणार; सामान्य भाडे लागू होणार

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, कोविड प्रोटोकॉलमध्ये रेल्वेने विशेष श्रेणींमध्ये ट्रेन चालवण्यास सुरुवात केली होती. त्याचा उद्देश ट्रेनमधील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा होता. सध्या 95 टक्के मेल एक्स्प्रेस गाड्या रुळावर आल्यात. यातील सुमारे 25 टक्के गाड्या विशेष श्रेणीत धावत आहेत.

रेल्वे लवकरच Special Trains थांबवणार; सामान्य भाडे लागू होणार
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 10:13 PM

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात आणि त्यानंतरही प्रदीर्घ काळ भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवल्या. यावेळी बहुतांश एक्सप्रेस आणि मेल गाड्या रुळावर आल्यात. त्यापैकी एक चतुर्थांश गाड्या अजूनही विशेष गाड्यांच्या श्रेणीत धावत आहेत. लवकरच या विशेष गाड्या बंद करण्यात येणार असल्याचे संकेत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले. विशेष ट्रेनमधील प्रवाशांना सामान्य गाड्यांपेक्षा 30 टक्के जास्त भाडे द्यावे लागते.

95 टक्के गाड्या रुळावर

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, कोविड प्रोटोकॉलमध्ये रेल्वेने विशेष श्रेणींमध्ये ट्रेन चालवण्यास सुरुवात केली होती. त्याचा उद्देश ट्रेनमधील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा होता. सध्या 95 टक्के मेल एक्स्प्रेस गाड्या रुळावर आल्यात. यातील सुमारे 25 टक्के गाड्या विशेष श्रेणीत धावत आहेत. याशिवाय पॅसेंजर गाड्यांमध्ये जवळपास 70 टक्के गाड्यांना मेल एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आलाय. यामध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जास्त भाडे मोजावे लागत आहे.

रेल्वे प्रवाशांना काय फायदा होणार?

रेल्वेमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव येण्यापूर्वी सुमारे 1700 मेल एक्स्प्रेस गाड्या धावत होत्या. यातील बहुतांश गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्यात. त्याच वेळी कोरोना संकटापूर्वी सुमारे 3500 पॅसेंजर ट्रेन धावत होत्या. सध्या यापैकी फक्त 1000 पॅसेंजर गाड्या धावत आहेत, तर प्रत्येक झोनच्या सर्व उपनगरीय गाड्या सुरू झाल्यात. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी न्यूज 18 शी खास बातचीत करताना आता रेल्वेत कोविडनंतर उचललेली पावले मागे घेण्यात येणार असल्याचे संकेत दिलेत. याचा रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. सामान्य गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी त्यांना कमी भाडे द्यावे लागणार आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.

संबंधित बातम्या

आधारमध्ये बायोमेट्रिक अपडेट करायचेय, मग किती शुल्क लागणार; जाणून घ्या

सावधान! तुम्हालाही आयकराचे मेसेज येतायत? चुकूनही रिफंड SMSच्या फंदात पडू नका, अन्यथा…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.