Ratan Tata net worth: रतन टाटा यांची 7,900 कोटींची संपत्ती, आता ही चार लोक करणार टाटांची अंतिम इच्छा पूर्ण

Ratan Tata’s personal property is worth Rs 7900 Crore: मेहिल मिस्त्री आणि रतन टाटा हे आरएनटी असोसिएट्सचे सदस्य होते. ते टाटा सन्सचे माजी अध्यक्ष दिवंगत सायरस मिस्त्री यांचे चुलत भाऊ आहेत. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्यासंबंधीच्या वादात त्यांनी रतन टाटा यांना सातत्याने पाठिंबा दिला होता.

Ratan Tata net worth: रतन टाटा यांची 7,900 कोटींची संपत्ती, आता ही चार लोक करणार टाटांची अंतिम इच्छा पूर्ण
Ratan Tata
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 1:27 PM

Ratan Tata net worth: भारतीय उद्योग विश्वातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्व रतन टाटा यांचे काही दिवसांपूर्वी मुंबईत निधन झाले. रतन टाटा यांच्या मागे त्यांची 7,900 कोटींची संपत्ती आहे. रतन टाटा यांनी त्यांचे मृत्यूपत्र तयार करुन ठेवले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मृत्यूपत्र लागू करण्याची जबाबदारी त्यांचे वकील मित्र डेरियस खंबाटा आणि सहकारी मेहली मिस्त्री यांच्यावर दिली आहे. तसेच यासाठी तिच्या सावत्र बहिणी शिरीन आणि डायना जीजीभॉय यांनाही नामांकित केले आहे.

या ठिकाणी आहे गुंतवणूक

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार रतन टाटा यांच्याजवळ टाटा सन्सचे 0.83% भागेदारी होती. तसेच त्यांची संपत्ती 7,900 कोटी आहे. रतन टाटा यांची इच्छा अशी होती की, त्यांचा संपत्तीचा सर्वात मोठा भाग परोपकारासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी द्यावा. त्यांच्या एकूण संपत्तीपैकी जवळपास तीन चतुर्थांश भाग टाटा सन्समध्ये आहे. तसेच टाटा यांनी ओला, पेटीएम, ट्रॅक्सन, फर्स्टक्राय, ब्लूस्टोन, कारदेखो, कॅशकारो, अर्बन कंपनी आणि अपस्टॉक्ससह सुमारे दोन डझन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, यापैकी काही कंपन्यांनी आपली भागेदारी त्यांनी नंतर विकली आहे.

कुठे, कुठे आहे गुंतवणूक

रतन टाटा यांचे मुंबईतील कुलाबामध्ये घर आहे. तसेच अलीबागमधील समुद्र किनारी होलिडे होम आहे. त्यांच्या मृत्यूपत्राची माहिती पूर्णपणे खासगी ठेवली आहे. मेहली मिस्त्री हे रतन टाटा यांचे विश्वासू होते आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टच्या बोर्डवर विश्वस्त होते. टाटा समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांमधील टाटा सन्सच्या समभागाचे बाजार मूल्य सुमारे 16.71 लाख कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत डेरियस खंबाटा

रतन टाटा यांचे मृत्यूपत्र तयार करण्यात वकील खंबाट्टा यांनी मदत केली होती. सुमारे सात वर्षांच्या कालावधीनंतर ते मागील वर्षी टाटाच्या दोन प्राथमिक ट्रस्टचे विश्वस्त म्हणून परत आले. त्यांनी 2016 मध्ये त्यांनी खासगी कारणामुळे ट्रस्ट सोडला होता.

कोण आहेत मेहली मिस्त्री

मेहिल मिस्त्री आणि रतन टाटा हे आरएनटी असोसिएट्सचे सदस्य होते. ते टाटा सन्सचे माजी अध्यक्ष दिवंगत सायरस मिस्त्री यांचे चुलत भाऊ आहेत. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्यासंबंधीच्या वादात त्यांनी रतन टाटा यांना सातत्याने पाठिंबा दिला होता. रतन टाटा यांच्या प्रकृतीची काळजी तेच घेत होते.

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.