Ratan Tata Death : इस्रायल-इराणपर्यंत…परदेशात कुठपर्यंत, कुठल्या-कुठल्या व्यवसायात पसरलय टाटा ग्रुपच साम्राज्य?
Ratan Tata Death : टाटाची गणना आज देशातील नाही, तर जगातील टॉप कंपन्यांमध्ये होते. टाटांच साम्राज्य इस्रायल, इराण, ब्रिटनपासून अमेरिकेपर्यंत पसरलेलं आहे. रतन टाटा यांनी टाटा ग्रुपला त्या उंचीपर्यंत पोहोचवलं, जे कुठल्याही कंपनीच स्वप्न असतं.
देशाचे अनमोल रत्न रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी टाटा ग्रुपला त्या उंचीपर्यंत पोहोचवलं, जे कुठल्याही कंपनीच स्वप्न असतं. त्यांनी टाटा समूहाच्या ज्या कुठल्या कंपनीला हात लावला, ती सोनं बनली. टाटाची गणना आज देशातील नाही, तर जगातील टॉप कंपन्यांमध्ये होते. टाटांच साम्राज्य इस्रायल, इराण, ब्रिटनपासून अमेरिकेपर्यंत पसरलेलं आहे. टाटांच साम्राज्य 100 देशांमध्ये आहे. इस्रायलमध्ये टाटा टेक सेक्टरमध्ये आहे. इथे टाटा कंसल्टेंसी सर्विसेज काही महत्त्वाच्या प्रोजेक्ट्समध्ये सहभागी आहे. तीन वर्षांपूर्वी इस्रायलच्या पहिल्या पूर्ण डिजिटल बँकेने बँकिंग सर्विस ब्युरोसाठी पहिल्या क्लायंटच्या रुपात टीसीएससोबत करार केला. त्याशिवाय ज्वेलरी सेक्टरमध्ये टाटांचा साम्राज्य पसरलेलं आहे.
TCS ला इस्रायलची टेक्नोलॉजी आणि स्टार्टअपमध्ये खूप इंटरेस्ट आहे. TCS ला इस्रायलमध्ये व्यवसायाची मोठी संधी आहे. इस्रायलमध्ये TCS 2005 सालापासून आहे. टीसीएसचे जवळपास 1,100 कर्मचारी इस्रायलमध्ये नोकरी करतात.
वेगवेगळ्या देशात टाटा कंपनी काय काम करते?
इराणमध्ये टाटा समूह स्टील सेक्टरमध्ये आहे. टाटा ग्रुपची कंपनी टाटा स्टीलचा इथे बिझनेस आहे. दक्षिण कोरियात टाटा ट्रकचा बिझनेस आहे. ब्रिटनमध्ये टाटा कंपनी कार बनवते. वर्ष 2000 मध्ये टाटाने लंडनमध्ये टेटलीच अधिग्रहण केलेलं. अमेरिकेत सुद्धा टाटा टेक सेक्टरमध्ये आहे. अरब देशात टाटाच मुख्य काम डिफेन्स आणि मायनिंग सेक्टरमध्ये आहे. टाटाने एंग्लो-डच स्टील निर्माता कोरस समूहाला 11 अब्ज अमेरिकी डॉलरमध्ये विकत घेतलं. फोर्ड मोटर कंपनीकडून प्रसिद्ध कार ब्रांड जगुआर आणि लँड रोव्हरला 2.3 अब्ज अमेरिकी डॉलरमध्ये विकत घेतलं.