Ratan Tata | सगळ्या पाकिस्तानवर एकटे रतन टाटा भारी, विश्वास नसेल, तर हा घ्या पुरावा

Ratan Tata | पाकिस्तानवर 125 अब्ज डॉलरच परदेशी कर्ज आहे. पाकिस्तानला जुलै महिन्यात 25 अब्ज डॉलरच परदेशी कर्ज चुकवायच आहे. त्यासाठी बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तानचे प्रयत्न सुरु आहेत.

Ratan Tata | सगळ्या पाकिस्तानवर एकटे रतन टाटा भारी, विश्वास नसेल, तर हा घ्या पुरावा
Ratan Tata
Follow us
| Updated on: Feb 19, 2024 | 3:17 PM

Ratan Tata | मागच्या एका वर्षात टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांनी जबरदस्त रिर्टन दिला आहे. त्यामुळे ग्रुपच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झालीय. महत्त्वाच म्हणजे टाटा ग्रुपच मार्केट कॅप पाकिस्तानच्या एकूण जीडीपीच्या पुढे गेलय.टाटा ग्रुप एकूण मार्केट कॅप 365 बिलियन डॉलर म्हणजे 30.3 लाख कोटी रुपये झालय. दुसऱ्याबाजूला IMF नुसार, पाकिस्तानचा एकूण जीडीपी 341 बिलियन डॉलर आहे. टाटा ग्रुपमधील TCS ही सर्वात मोठी कंपनी आहे. त्याच व्हॅल्युएशन 170 बिलियन डॉलर म्हणजे 15 लाख कोटीच्या पुढे गेलय. भारतातील ही दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

मागच्या एका वर्षात ग्रुपच्या कंपन्यांच शेअर मुल्य प्रचंड वाढलं. त्यामुळे टाटा ग्रुपची मार्केट कॅप वाढली. टाटा मोटर्स आणि ट्रेंट मल्टीबॅगर रिटर्नशिवाय मागच्या एकावर्षात टायटन, टीसीएस आणि टाटा पॉवरच्या शेअरसमध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. लिस्टेड टाटा टेक्नोलॉजीज सह कमीत कमी 8 टाटा कंपन्यांच व्हॅल्युएशन मागच्या एका वर्षात डबल झालय. यात टीआरएफ, ट्रेंट, बनारस हॉटेल्स, टाटा इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा मोटर्स, ऑटोमोबाइल कॉर्पोरेशन ऑफ गोवा आणि आर्टसन इंजीनिअरिंग आहे.

पाकिस्तानपेक्षा भारताची इकोनॉमी कितीपट मोठी?

भारताच्या जीडीपीची सध्याची साइज जवळपास 3.7 ट्रिलियन डॉलर आहे. आकड्यांवर नजर टाकली, तर भारताचा जीडीपी पाकिस्तानच्या इकोनॉमीपेक्षा 11 पट अधिक आहे. आर्थिक वर्ष 2028 पर्यंत जापान आणि जर्मनी या दोन्ही देशांना मागे टाकून भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. सद्य स्थितीत भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे.

वर्ष 2022 मध्ये पाकिस्तानचा जीडीपी किती?

दुसऱ्याबाजूला वित्त वर्ष 2022 मध्ये पाकिस्तानचा जीडीपी ग्रोथ 6.1 टक्के पहायला मिळाला होता. त्याच्या एकवर्ष आधी हा आकडा 5.8 टक्के होता. आता अंदाज असा लावला जातोय की, पुरामुळे मोठ नुकसान झालय. त्यामुळे पाकिस्तानचा ग्रोथ रेट आर्थिक वर्ष 2023 मध्ये खाली जाऊ शकतो.

पाकिस्तानवर किती अब्ज डॉलरच परदेशी कर्ज?

माहितीनुसार, पाकिस्तानवर 125 अब्ज डॉलरच परदेशी कर्ज आहे. पाकिस्तानला जुलै महिन्यात 25 अब्ज डॉलरच परदेशी कर्ज चुकवायच आहे. त्यासाठी बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तानचे प्रयत्न सुरु आहेत. दुसऱ्याबाजूला आयएमएफचा 3 अब्ज डॉलरचा प्रोग्रॅम पुढच्यावर्षी संपतोय. पाकिस्तानचा विदेश मुद्रा भंडार जवळपास 8 बिलियन डॉलर आहे, ज्या आधारे पुढच्या दोन महिन्यापर्यंत सामानाची आयात करता येऊ शकते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.