हक्काचं राशन शहरातही मिळवा,गावाकडच्या कार्डावर आता शहरातही मिळवा धान्य

'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड' या योजनेनं लाभार्थ्यांसाठी संपूर्ण भारत अन्नधान्याचं कोठार बनलं आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे रेशनकार्डधारकांना आता कोठूनही रेशन उचलता येईल. त्याला असणा-या गाव, तालुका,जिल्हा, राज्याच्या सीमा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. काय ही योजना चला तर समजून घेऊयात.

हक्काचं राशन शहरातही मिळवा,गावाकडच्या कार्डावर आता शहरातही मिळवा धान्य
आता कोठुनही मिळवा राशन कार्डवर धान्यImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 5:44 PM

वन रेशन, वन नेशन (One ration, one nation) या अभिनव संकल्पनेने संपूर्ण राष्ट्र लाभार्थ्यांसाठी अन्नधान्याचं कोठार बनलं आहे. भारतातील कुठल्याही लाभार्थ्याला आता प्रांताच्या, विभागाच्या आणि राज्याच्या सीमांचं बंधन राहिलं नाही. या योजनेनं राशन प्रक्रियेत पारदर्शकता आणलीच आहे. परंतु, अन्नधान्यासाठी गावाची हद्द ही ओलांडली आहे. आता गरीब नागरिकांना त्यांच्या हक्काचे राशन कुठे ही प्राप्त करता येईल. गावाकडच्या राशनकार्डवर त्यांना शहरातील राशन दुकानावरुनही (City Rationing Centre) धान्य मिळवता येईल. त्यासाठी अर्थातच आधारकार्डची (Aadhar Card) मदत घेतली जाणार आहे. आधारकार्डवरील बायोमेट्रीक प्रणालीआधारे लाभार्थ्याची (Beneficiary) ओळख पटवून त्याला शहरातही गावातील रेशनकार्ड आधारे अन्नधान्य उचलता येईल. परंतू या योजनेसाठी एक अर्ज तेवढा लाभार्थ्याला शहराकडे जाण्याअगोदर करावा लागले. त्यामध्ये आधार सीडिंग केल्यानंतर या योजनेचा लाभ त्याला घेता येईल.

काय आहे PoS

राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यातंर्गत राज्यातील कोणत्याही रेशनिंगच्या दुकानावरुन रेशनकार्डधारकांना देशातील कोणत्याही दुकानातून धान्य खरेदी करता येईल. या योजनेतंर्गत देशातील पीडीएसधारकांना कोणत्याही सार्वजनिक वितरण प्रणाली असणा-या दुकानातून त्याच्या वाट्याचं आणि कोट्याचं राशन उचलता येणार आहे. आता या राशनधारकाची ओळख पटवण्यासाठी या प्रणालीत काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल (PoS) या प्रणालीच्या वापरातून राशनकार्डधारकाची ओळख पटवण्यात येणार आहे. सरकार राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांर्गत देशभरात 80 कोटींहून अधिक स्वस्त धान्याचा पुरवठा करते.

दहा अंकी कार्ड महत्वाचे

एक देश एक रेशनकार्ड योजनेत लाभार्थ्यांना दहा अंकांचे एक कार्ड वितरीत करण्यात आले आहे. आता या दहा अंकात पोस्टल सारखी सिस्टिम करण्यात आली आहे. त्यानुसार, या कार्डवरील पहिले दोन आकडे हे राज्याचा कोड आहेत. त्याच्या पुढचे दोन अंक हे रेशन कार्डाच्या संख्येवर आधारीत आहेत. त्यापुढील अंक हे कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ओळख पटवणारी असतील. हे दहा अंकी कार्ड तुम्हाला दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे. एक तर त्या प्रातांची स्थानिक भाषा असेल तर दुसरी भाषा ही हिंदी अथवा इंग्रजी यापैकी एक असेल.

हे सुद्धा वाचा

आधार कार्ड कसे कराल लिंक

या योजनेत तुमचे राशन कार्ड हे स्वयंचलित एकात्मिक व्यवस्थापन वितरण प्रणालीशी (impds.nic.in) जोडलेले असते. त्यासोबत आधार कार्ड लिंक केल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो.

त्यासाठी गावातील राशन कार्ड दुकादाराकडे जा तुमच्या घरातील कुटुंब प्रमुख आणि रेशन कार्डमध्ये ज्यांचा नावाचा समावेश आहे अशा लाभार्थ्यांचे आधार कार्ड घेऊन जा

कुटुंब प्रमुखांचा एक फोटो ही सोबत असू द्या

दुकानदाराकडे ही सगळी कागदपत्रे जमा करा

कर्मचारी ही सर्व प्रक्रिया प्रमाणीकरण केल्यानंतर पूर्ण करुन देईल

मोबाईलवर आलेल्या मॅसेजआधारे राशनकार्ड आधारकार्डशी लिंक होईल

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.