SBI नंतर RBI ची ‘या’ बँकेवर मोठी कारवाई, थेट एक कोटींचा ठोठावला दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (फसवणूक-वर्गीकरण आणि व्यावसायिक बँका आणि निवडक वित्तीय संस्थांद्वारे अहवाल) निर्देश 2016 आणि बँकांना तणावग्रस्त मालमत्ता विकण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याचे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आता बँकिंग नियमांच्या उल्लंघनावर कठोर भूमिका घेत आहे. अलीकडेच देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, आता सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाला एक कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय.
युनियन बँक ऑफ इंडियाला 1 कोटींचा दंड
RBI ने नियमांचा भंग केल्याप्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. केंद्रीय बँकेने सोमवारी ही माहिती दिली. यासंदर्भातील आदेश रिझर्व्ह बँकेने 25 नोव्हेंबरला जारी केलाय.
मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे ठोठावला दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (फसवणूक-वर्गीकरण आणि व्यावसायिक बँका आणि निवडक वित्तीय संस्थांद्वारे अहवाल) निर्देश 2016 आणि बँकांना तणावग्रस्त मालमत्ता विकण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याचे केंद्रीय बँकेने म्हटले आहे. त्यांनी 31 मार्च 2019 ला बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात वैधानिक तपासणी आणि देखरेख मूल्यांकन (ISE) केलेय, सेंट्रल बँकेने म्हटले आहे.
अलीकडेच आरबीआयने एसबीआयला एक कोटींचा दंड ठोठावला
अलीकडेच RBI ने नियामकांचे पालन न केल्यामुळे SBI ला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, हा दंड 16 नोव्हेंबर 2021 ला जारी करण्यात आलेल्या आदेशात लावण्यात आलाय. मध्यवर्ती बँकेच्या मते, आर्थिक स्थितीच्या संदर्भात, 31 मार्च 2018 ते 31 मार्च 2019 दरम्यान SBI च्या देखरेख मूल्यांकनावर वैधानिक निरीक्षण केले गेले. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियामक निर्देशांचे पालन न केल्याबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. भारतीय रिझर्व्ह बँक निर्देश 2016 चे पालन न केल्याबद्दल एसबीआयवर दंडात्मक कारवाई केल्याचे आरबीआयने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, एसबीआयने व्यावसायिक बँका आणि निवडक वित्तीय संस्थांच्या वतीने ग्राहकांसोबत फसवणुकीचे वर्गीकरण आणि अहवाल देण्यासाठी नियमांचे उल्लंघन केले होते. बँकिंग नियमन अधिनियम, 1949 च्या कलम -47 ए (1) (सी) च्या तरतुदीनुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करून त्याने हा दंड लावला होता. तसेच ही कारवाई नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित असल्याचे सांगितले होते.
संबंधित बातम्या
3 ते 5 वर्षांच्या FD मध्ये गुंतवणूक करायची का? खासगी आणि सरकारी बँकांचे नवे दर काय?
सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित नवा नियम 1 डिसेंबरपासून लागू, पालन न झाल्यास होणार तुरुंगवास