Bank : महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना रद्द, आरबीआयने केली कारवाई, तुमचा तर पैसा अडकला नाही ना..

Bank : महाराष्ट्रातील या बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कारवाई केली आहे.

Bank : महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना रद्द, आरबीआयने केली कारवाई, तुमचा तर पैसा अडकला नाही ना..
या बँकेवर कारवाईImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 2:46 PM

नवी दिल्ली : नियमांचे पालन न करणाऱ्या आणि मनमानी कारभार करणाऱ्या बँकांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India-RBI) तडक कारवाई करते. गेल्या चार महिन्यात राज्यातील दोन-तीन बँकांवर (Bank) आरबीआयने यापूर्वी कडक कारवाई केली आहे. तर पुण्यातील प्रसिद्ध रुपी बँकेला कायमचं टाळे लागले आहे.

RBI देशभरातील बँकांच्या कारभारावर कायम लक्ष ठेवते. यामध्ये सरकारी आणि खासगी या दोन्ही प्रकाराच्या बँकांवर आरबीआयचा अंकुश असतो. जर बँका नियमानुसार वागल्या नाहीत रत्यांना नोटीस देण्यात येते. त्यानंतर ही बँकांचे कामकाज सुधारले नाही तर अशा बँकांविरोधात कडक कारवाई करण्यात येते.

RBI काही बँकांना कारभार सुधारण्याची संधी देते. त्यांच्यावर दंड लावते. दंड वसूल करते. तरीही बँकांचे कामकाज सुधारले नाही तर, बँकांचा परवाना रद्द करण्यात येतो. अशा बँकांमधील गुंतवणूकदारांच्या ठेवी काही प्रमाणात परत करण्यात येतात.

हे सुद्धा वाचा

RBI ने महाराष्ट्रातील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर कडक कारवाई केली आहे. या बँकेचा परवाना केंद्रीय बँकेने रद्द केला आहे. शुक्रवारी केंद्रीय बँकेने कारवाईचा बडगा उगारला. बँकेने नियम तोडल्याचा ठपका ठेवला आहे.

आरबीआयकडे उपलब्ध आकड्यांनुसार, या कारवाईनंतर सहकारी बँकेच्या 79 टक्के ठेवीदारांना दिलासा मिळेल. त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून मिळविता येईल.

यापूर्वी अनेक बँकांच्या ठेवीदारांना DICGC कडून मदत मिळाली आहे. 16 ऑक्टोबर 2022 रोजीपर्यंत DICGC ने देशभरात एकूण विमा राशीपैकी 294.64 कोटी रुपये ठेवीदारांना नुकसान भरपाईच्या रुपात देण्यात आले आहे.

रिझर्व्ह बँकेने बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडला बँकिंग व्यवसाय करण्यास प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे बँकेला आता ठेवीदारांकडून ठेवी जमा करता येणार नाही आणि रक्कम ही वाटप करता येणार नाही.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.