RBI On Note : गायब नोटांना फुटले पाय, काय म्हणाली RBI

RBI On Note : नोटाबंदीचा गोंधळ कमी होता म्हणून आता नवीन वाद ओढवल्या गेला आहे. एकानंतर एक बातम्या समोर येत आहेत आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.

RBI On Note : गायब नोटांना फुटले पाय, काय म्हणाली RBI
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 1:44 PM

नवी दिल्ली : नोटाबंदीचा गोंधळ, नोटा माघारी बोलवणे आणि नोटा गायब होत असल्याचा प्रकार, सर्वच प्रकरणात आरबीआयची ससेहोलपट तर होत नाही ना? गेल्या एक वर्षांपासून रेपो रेट धोरणावरुन देशातील केंद्रीय बँकेच्या (Reserve Bank Of India) भूमिकेवर मध्यमवर्ग नाराज होता. त्यातच आरबीआयच्या निर्णयावरुन बातम्या समोर येतात आणि नंतर आरबीआयला त्यावर स्पष्टीकरणासाठी समोर यावे लागते. त्यामुळे आर्थिक नियोजन करणाऱ्या देशाच्या बलाढ्य बँकेच्या डायलॉग डिलिव्हरीवर पण प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 500 रुपपयांच्या नोटा (500 Rupees Note Disappeared) बाजारातून गायब झाल्याच्या वृत्तानंतर त्यावर केंद्रीय बँकेला तातडीने त्यांची भूमिका जाहीर करावी लागली. पण काल त्यांच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचे द फ्री प्रेस जर्नलने स्पष्ट केले होते.

काय होती बातमी द फ्री प्रेस जर्नलमधील एका रिपोर्टनुसार, या नोटा कुठे गायब झाल्या याचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. 1,760.65 दशलक्ष 500 रुपयांच्या नोटा गायब आहेत. एप्रिल 2015 ते मार्च 2016 पर्यंतच्या नाशिक प्रिटिंग प्रेसमध्ये मुद्रित 210 दशलक्ष नोटांचा यामध्ये समावेश आहे. गायब झालेल्या नोटांचे मुल्य 88,032.5 कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रवक्त्याने याप्रकरणात प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचे वृत्तात म्हटले होते.

काय म्हणाली आरबीआय हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर गाजल्यावर आरबीआयने तातडीने याप्रकरणात स्पष्टीकरण दिले. केंद्रीय बँकेने 88,032.5 कोटींच्या 500 रुपयांच्या नोटा गायब असल्याच्या वृत्ताचे खंडण केले. आरटीआय अंतर्गत जी माहिती दिली, तिचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचा दावा आरबीआयने केला आहे. देशातील तीन प्रिटिंग प्रेसमधून 500 रुपयांच्या नोटांची जी माहिती देण्यात आली, तिचा चुकीचा अर्थ काढल्याचे म्हणणे आरबीआयने मांडले.

हे सुद्धा वाचा

नोटा सुरक्षित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याविषयीचे एक निवेदन प्रसिद्ध केले असून ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे. त्यानुसार, 500 रुपयांच्या नोटा गायब झालेल्या नाहीत. प्रिटिंग प्रेसकडून मिळालेली माहिती चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा दावा बँकेने केला. तसेच या नोटा सुरक्षित आहेत. प्रिटिंग प्रेसमधील नोटांची छपाई, त्यांचा साठा आणि वितरण यावर देखरेख करण्यात येते. त्यावर नियंत्रण असल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे.

RTI मधून माहिती आरटीआयमधून हा खळबळजनक खुलासा झाला. मनोरंजन रॉय यांनी आरटीआयअंतर्गत ही माहिती मागितली होती. नाशिक करन्सी नोट प्रेसद्वारा 375.450 दशलक्ष 500 रुपयांच्या नवीन नोटांचे मुद्रण करण्यात आले होते. परंतु, रिझर्व्ह बँकेकडील नोंदीनुसार, केवळ 345.000 कोटी नोटा मिळाल्या आहेत. या नोटा एप्रिल 2015 ते डिसेबर 2016 पर्यंत मुद्रित करण्यात आल्या होत्या, असा दावा याविषयीच्या वृत्तात करण्यात आला होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.