RBI Credit Pocily: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीला सुरुवात, नवे व्याजदर ठरणार, सामान्य नागरिकांवर काय परिणाम?

RBI Policy | यापूर्वी जून महिन्यात पतधोरण समितीने व्याजदर स्थिर ठेवले होते. त्यानंतर आता सलग सातव्यांदा रिझर्व्ह बँक हाच निर्णय घेईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

RBI Credit Pocily: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीला सुरुवात, नवे व्याजदर ठरणार, सामान्य नागरिकांवर काय परिणाम?
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 7:01 AM

मुंबई: रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या (MPC) बैठकीला बुधवारपासून सुरुवात झाली. ही बैठक एकूण तीन दिवस चालणार असून त्यानंतर पतधोरण समितीकडून नवे व्याजदर जाहीर केले जातील. देशातील सध्याची स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर स्थिरच ठेवले जातील, असा जाणकारांचा होरा आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यांची पतधोरण समिती द्वैमासिक आढाव्यानंतर व्याजदर जाहीर करत असते. या समितीमध्ये रिझर्व्ह बँकेशिवाय तीन बाहेरच्या तज्ज्ञ सदस्यांचाही समावेश आहे. सध्याची परिस्थिती पाहता रिझर्व्ह बँक कोणताही मोठा निर्णय घेताना विचार करेल. कारण, रोकड तरलतेचे व्यवस्थापन आणि आर्थिक विकासदर अशा दोन घटकांवर सध्या रिझर्व्ह बँक अधिक लक्ष ठेवून आहे.

यापूर्वी जून महिन्यात पतधोरण समितीने व्याजदर स्थिर ठेवले होते. त्यानंतर आता सलग सातव्यांदा रिझर्व्ह बँक हाच निर्णय घेईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

तुम्हाला फायदा काय?

रेपो दरात कपात केल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना होतो. आरबीआयने व्याजदरात बदल केल्यास बँकांकडूनही त्या अनुषंगाने बदल केले जातात. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज याच्या हप्त्याच्या रक्कमेवर परिणाम होतो.

रेपो दर म्हणजे काय? रेपो दर किंवा रेपो रेट म्हणजे बँका रिझर्व्ह बँकेकडून ज्या दराने पैसा घेते तो दर. रेपो दर वाढल्यास, बँकांना रिझर्व्ह बँकांना वाढीव व्याजदराने पैसे द्यावे लागतात. त्याचा परिणाम म्हणून बँक आपल्या कर्जदारांचं व्याजदर वाढवते. त्यामुळे रेपो दरात कपात झाल्यास, बँकाही आपल्या कर्जदारांचं व्याजदर कमी करतात. रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळतात. त्यामुळे बँका कर्जदारांना पैसे देताना कमी दरात देऊ शकतात.

रिव्हर्स रेपो म्हणजे काय? रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट. जशा बँका आरबीआयकडून कर्ज घेतात, तसं आरबीआयही बँकाकडून कर्ज घेते, ठेवी ठेवल्या जातात. तो दर म्हणजे रिव्हर्स रेपो दर होय. रेपो दरामध्ये बदल झाल्यानंतर तोच दर रिव्हर्स रेपो दराला लागू होतो.

इतर बातम्या:

सावधान! व्होडाफोन आयडियाने आपल्या 27 कोटी वापरकर्त्यांना दिला इशारा, जिओ आणि एअरटेल वापरकर्त्यांनीही सतर्क रहा

व्होडाफोन, आयडिया युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता या 23 रिचार्ज पॅकवर मिळवा 60 रुपयांपर्यंत कॅशबॅक

Good News! आता एकच अकाऊंट 25 जणांमध्ये वापरा, Idea आणि Vodafone ची धमाकेदार ऑफर

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....