तुमच्या गृहकर्जाचा EMI कमी होणार, आरबीआयकडून दिलासा
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. 0.25 टक्क्यांची कपात आरबीआयने रेपो रेटमध्ये केली असून, रेपो रेट 6.50 टक्क्यांवरुन 6.25 टक्क्यांवर आले आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतरही अनेक कर्जांवर याचा चांगला परिणाम होईल. गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, गृहकर्जदारांमध्ये काहीसं आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या […]
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. 0.25 टक्क्यांची कपात आरबीआयने रेपो रेटमध्ये केली असून, रेपो रेट 6.50 टक्क्यांवरुन 6.25 टक्क्यांवर आले आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतरही अनेक कर्जांवर याचा चांगला परिणाम होईल. गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, गृहकर्जदारांमध्ये काहीसं आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या तीन पतधोरणांमध्ये रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केले नव्हते.
2019-2020 या आर्थिक वर्षासाठी 7.4 एवढं जीडीपीचं लक्ष्य रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे.
तसेच, रिझर्व्ह बँकेचे दर कमी केल्यानंतर रिव्हर्स रेपो रेट 6 टक्के होईल. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने आपलं मत तटस्थ ठेवलं असून, मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या 6 सदस्यांमध्ये 4 जणांनी दर कमी करण्यासाठी मत दिले आहे.
अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी एक मोठी संस्था उभारावी, असा प्रस्ताव रिझर्व्ह बँकने दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी काय?
शेतकऱ्यांसाठीही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. काहीही तारण न ठेवता एक लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. याआधी ही मर्यादा एक लाख रुपयांपर्यंतच होती. आता 60 हजार रुपयांची रक्कम यात वाढवण्यात आली आहे.
पुढील अंदाज काय?
आरबीआयच्या मते, जानेवारी ते मार्च 2019 दरम्यान महागाईचे दर 2.8 टक्के राहील, तर एप्रिल ते सप्टेंबर 2019 च्या दरम्यान महागाई दर 3.2 टक्के ते 3.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे. रिझर्व्ह बँकेच्या या अंदाजामुळे येत्या काळातही व्याजाचे दर कमी होण्याची शक्यता वाढली आहे.
VIDEO : आरबीआयची पत्रकार परिषद
#WATCH RBI Governor addresses the media on Monetary Policy https://t.co/0fPJFbfY8B
— ANI (@ANI) February 7, 2019